दीपिकाची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग?

अनुष्कापेक्षा दीपिकाची अंगठी महाग 

 दीपिकाची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग?

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने इटलीतून आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दीपवीरचे चाहते अगदी दोन दिवसांपासून या जोडीच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते. 

दीपिका नववधुच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती. तिने हा फोटो शेअर केल्यावर साऱ्यांच्या नजरा तिच्या हातातील अंगठीवर खिळल्या. सुंदर अशा वेगवेगळ्या अंगठ्यांमध्ये तिची साखरपुड्याची अंगठी देखील दिसली. 

हिऱ्यांची सुंदर अंगठी दीपिकाच्या हातात खूप सुंदर दिसत होती. रणवीरने आपल्या 'मस्तानी'साठी ही करोडो रुपयांची अंगठी खूप आधीपासूनच तयार केली होती. 

3 करोड रुपयांची अंगठी 

या अंगठीकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आणि त्याला कारणही तसंच आहे. या अंगठीची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या अंगठीची किंमत 2.7 करोड रुपये आहे. ही अंगठी सिंगल सोलिटेअर स्केअर डायमंड रिंग असून अतिशय सुंदर आहे. 

गेल्यावर्षी लग्नबंधनात अडकलेल्या विराटने आपली पत्नी अनुष्काला 1 करोड रुपयांची हिऱ्यांची अंगठी घातली होती. तर सोनम कपूरची वेडिंग रिंग ही 90 लाखांची होती. 

deepika padukone

दीपिका - रणवीरने 14 - 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केलं आहे. 14 नोव्हेंबरला दीपिकाच्या कोंकणी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला आहे.

या दोन्ही पद्धतीने लग्न केलेले फोटो समोर आले असून यामध्ये दीपवीर अतिशय सुंदर दिसत आहे. बॉलिवूडकरांनी या दोघांनी कुणाची दृष्ट लागू नये असं म्हटलं आहे.