दीपिकाच्या ओढणीवर लिहिला हा शुभाशिर्वाद...

काय आहे हा आशिर्वाद 

 दीपिकाच्या ओढणीवर लिहिला हा शुभाशिर्वाद...

मुंबई : अखेर सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच लग्न संपन्न झालं आहे. चाहत्यांना ज्या फोटोची आतुरतेने उत्सुकता होती ते फोटो त्यांच्या कलाकारांनी देखील शेअर केला आहे.  नववधु आणि वराच्या जोड्यात दोघांचे फोटो समोर आले. दीपिका आणि रणवीरने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. आणि अगदी काही सेकंदात या फोटोला खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहे. 

दीपिका - रणवीरने 14 - 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केलं आहे. 14 नोव्हेंबरला दीपिकाच्या कोंकणी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला आहे.

या दोन्ही पद्धतीने लग्न केलेले फोटो समोर आले असून यामध्ये दीपवीर अतिशय सुंदर दिसत आहे. बॉलिवूडकरांनी या दोघांनी कुणाची दृष्ट लागू नये असं म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Deepika Padukone (@deepikapadukone) and Ranveer Singh (@ranveersingh) head-to-toe in Sabyasachi for their wedding in Lake Como, Italy. All of us at Sabyasachi wish the lovely couple all the very best for a wonderful and happy married life. Photo Courtesy: @errikosandreouphoto #Sabyasachi #BridesOfSabyasachi #SabyasachiBride #GroomsOfSabyasachi #SabyasachiGroom #DeepVeer #DeepVeerKiShaadi #DeepVeerWedding #DeepikaPadukone #RanveerSingh #DreamWedding #DestinationWedding #LakeComo @lakecomoweddings @lakecomoexplore #TheWorldOfSabyasachi @bridesofsabyasachi @groomsofsabyasachi

A post shared by Sabyasachi Mukherjee (@sabyasachiofficial) on

कोंकणी पद्धतीनुसार दीपिकाने गोल्डन - रेड कलरचा लेहंगा घातला होता तर रणवीरने सफेद आणि गोल्डन रंगाचा कुर्ता धोती घातली होती. या दोन्ही जोड्यांचे कपडे हे लोकप्रिय डिझाइनर सब्यासाचीने तयार केले आहेत. तिथेच सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नात रणवीर सिंहने कांजीवरम शेरवानी घातली होती. आणि लाल रंगाचा साफा घातला होता.

तर दीपिका सब्यासाचीच्या सिग्नेचर लेहंग्यामध्ये होती. लेहंग्यावर असलेल्या ओढणीची खास चर्चा होती. कारण या ओढणीवर खास आर्शिवाद लिहिला होता. दीपिकाच्या लेहंग्यावर जी ओढणी होती त्यावर - सदा सौभ्यावती भव असा हिंदू परंपरेनुसार आशिर्वाद लिहिला होता.

हा लेहंगा नवऱ्याच्या कुटुंबियांकडून नववधुला दिला जातो. दीपिकाला हा लेहंगा रणवीरच्या कुटुंबाकडून देण्यात आला आहे. याचमार्फत तिला आशिर्वाद देण्यात आला आहे.