अन् रणवीर सिंहने 'खल्जी'ला केला अलविदा

येत्या १ डिसेंबरला संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा येतोय.

Updated: Nov 6, 2017, 08:20 AM IST
अन् रणवीर सिंहने 'खल्जी'ला केला अलविदा  title=

 मुंबई : येत्या १ डिसेंबरला संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा येतोय.

एकीकडे प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद आणि दुसरीकडे काही संघटनांचा विरोध अशा या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.  
 
 पद्मावतीच्या ट्रेलरला आणि चित्रपटातील पहिलं गाणं 'घुमर' ला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता चित्रपट कसा असेल याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. नुकतीच चित्रपटाच्या टीमची एक छोटेखानी पार्टीदेखील पार पडली. 
 
दीपिका पदूकोण आणि शाहीद कपूरच्या बरोबरीने रणवीर सिंह  या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 'अल्लाउद्दीन खल्जी' या खलनायकाच्या भूमिकेत रणवीर सिंह झळकणार आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंहच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 

रणवीर सिंहने 'अल्लाउद्दीन खिल्जी'च्या भूमिकेसाठी खास प्रयत्न केले आहेत. मात्र आता त्याने या लूकला अलविदा केलं आहे. त्याने याबाबतची खास पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याखाली कॅप्शन लिहताना तो म्हणाला. अखेर अलविदा 'अल्लाउद्दीन'. गेली 1 वर्ष आणि काही महिने तुझ्यासोबत होतो. तुझ्या अतृप्त आत्म्याला शांती मिळो !!! 

दीपिका  पादुकोणने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका बजावली आहे. त्यानंतर शनिवारी तिने एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला शाहरुख खान, करण जोहर, आलिया भट्ट, कृति सेनन, गौरी खान, मनीष मल्होत्रा, जाह्न्वी कपूर, सारा अली खान, ईशान खट्टर, सोनाक्षी सिन्हा, अभिषेक बच्चन, आथिया शेट्टी, रितेश सिधवानी, जोया अख्तर व  इमरान खान पत्नीसोबत आला होता.