बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती रतन टाटांची 'ड्रीम गर्ल'; का होऊ शकलं नाही लग्न?

Ratan Tata Love Story : रतन टाटा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. या नावाभोवतीच एक वेगळं वलय आहे. पण रतन टाटा यांची लव्हस्टोरी मात्र अधुरीच आहे. बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला रतनन टाटा अनेक वर्ष करत होते डेट. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 8, 2024, 06:34 PM IST
बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती रतन टाटांची 'ड्रीम गर्ल'; का होऊ शकलं नाही लग्न?  title=

प्रत्येक व्यक्ती एकदा तरी प्रेमात पडतोच. पण हे देखील तितकंच खरं आहे की, प्रत्येकाला आपल्या वाट्याच प्रेम मिळतंच असं नाही. भारतातील एक दिग्गज व्यक्तीमत्त्व आणि उद्योजक रतन टाटा यांची मात्र प्रेम गाथा ही 'अधुरी एक कहाणी'. 

रतन टाटा यांच नाव भारतातच नाही तर संपूर्ण देशात अतिशय सन्मानाने घेतलं जातं. लंडनमध्ये 'सर' ही उपाधी मिळाल्यानंतर त्यांना आदराने 'सर रतन टाटा' असं देखील संबोधलं जाऊ लागलं. रतन टाटा यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं त्या त्या क्षेत्रात त्यांना यश मिळालं. या दरम्यान अनेकदा चढ उताराचा सामना करावा लागला. रतन टाटा यांनी जीवनात एक मानाचं स्थान संपादन केलं. 

1991 साली टाटा ग्रुपचे चेअरमन पद स्वीकारल्यानंतर कंपनीचा रेवेन्यू 40 टक्क्यांनी वाढला तर प्रॉफिट 50 टक्क्यांनी वाढलं. रतन टाटा दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा टॅक्स भरतात तर कोटी रुपयांचे दान देखील करतात. 

रतन टाटा यांचं शिक्षण, करिअर ते अगदी टाटा ग्रुपच्या चेअरमन पदावर विराजमान होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील एक कोपरा मात्र कायम रिकामाच राहिला. रतन टाटा यांची लव्हस्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे. रतन टाटा अविवाहित का? त्यांना कधी कुणाशी प्रेम झालं नाही का? तर त्याचा एक किस्सा आहे. 

रतन टाटांची अधुरी एक कहाणी 

रतन टाटा यांनी एकदा नव्हे तर तब्बल 4 वेळा प्रेम झालं. मात्र एकदाही त्यांचं लग्न झालेलं नाही. रतन टाटा यांचं शिक्षण झाल्यानंतर ते भारतात आले तेव्हा त्यांना एका सिने अभिनेत्रीशी प्रेम झालं. या अभिनेत्रीचं नाव आहे सिमी ग्रेवाल. दोघं अनेकवर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि डेट केलं होतं. याबाबतचा खुलासा स्वतः सिमी ग्रेवालने एका कार्यक्रमात केला होता.  त्यांनी सांगितलं होतं की, तो एक परिपूर्ण व्यक्ती आहे आणि त्याची विनोदबुद्धी अप्रतिम आहे. सिमीने सांगितले होते की, तिच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नसतो. लग्नाबाबत ग्रेवाल यांनी सांगितले की, त्यांचे नाते अर्धवटच राहिले आणि काही कारणास्तव लग्न होऊ शकले नाही. पण असं देखील म्हटलं जातं की, रतन टाटा यांच्या आजी यांनी या लग्नाला विरोध केला होता. रतन टाटा त्यांच्या आजीला अतिशय महत्त्व देतं. त्यामुळे त्यांनी हा शब्द पाळला.