'लाज वाटायला हवी...'; वसईत भररस्त्यात तरुणीची हत्या झाल्यानंतर रवीना टंडन संतप्त; म्हणाली, 'तिला वाचवू...'

Raveena Tondon On Vasai Murder Case : रवीना टंडननं वसईत भररस्त्यात झालेल्या तरुणीच्या हत्ये प्रकरणात संताप व्यक्त केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 20, 2024, 03:06 PM IST
'लाज वाटायला हवी...'; वसईत भररस्त्यात तरुणीची हत्या झाल्यानंतर रवीना टंडन संतप्त; म्हणाली, 'तिला वाचवू...' title=
(Photo Credit : Social Media)

Raveena Tondon On Vasai Murder Case : मुंबईच्या वसई परिसरात 18 जून रोजी रोहित यादव नावाच्या एका तरुणानं सगळ्यांसमोर आरती नावाच्या तरुणीची हत्या केली. या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. ज्यात तो आरोपी हा क्रुरतेनं त्या तरुणीची हत्या करताना दिसत आहे. तर तिथे उपस्थित असलेले लोक हे या घटनेला पाहत राहिले. त्यांनी काहीही केलं नाही त्याचा व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही संतापली आहे. तिनं या सगळ्या लोकांवर संताप व्यक्त केला आहे आणि त्यासोबत लाज वाटत असल्याचं सांगितलं. 

रवीनाची संतप्त प्रतिक्रिया

रवीना टंडननं ट्विटरवर या सगळ्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं की 'तिथे उपस्थित असलेले सगळे लोक तिला वाचवू शकत होते... ही लाजिरवानी गोष्ट आहेय. हे पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. काहीवेळा लोकांनी फक्त लक्ष देणं गरजेचं आहे, जरी ते करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात टाकावा लागत असला तरी. त्याच्याकडे टोकदार अशी कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे फक्त दोन लोकांनी धैर्यानं काम करणं गरजेचं आहे. खरंतर, असे शहाणपणा करणारे लोक खऱ्या आयुष्यात भित्रे असतात. जसा कोणी विरोध करतंय हे पाहतात तेव्हा पळून जातात. असे खोटे लोक खोट्याच्या मागे लपतात.'

रवीनाची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हो, त्यालोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केल्याच्या पद्धतीनं संताप आलाय, अगदी त्याच पद्धतीनं आम्हाला तेव्हा संताप आला होता जेव्हा तुझ्यावर हल्ला केलेल्या लोकांच्या विरोधातील केस तू परत मागे फिरवली असती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रवीना जेव्हा तुझ्या घराच्या आजुबाजूला गर्दी जमा झाली होती तेव्हा तुला वाचवण्यासाठी तुझ्या घराच्या आसपास कोणी आलं होतं का? नाही.' 

हेही वाचा : लग्नाआधीच सोनाक्षीला धक्का; आई आणि भावानं... झहीर इक्बालसोबतच्या नात्यामुळं कुटुंबीय नाराज?

काही दिवसांपूर्वी रवीना टंडनसोबत चुकीची वर्तवणूक केल्याचा आरोप समोर आला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. रवीनानं रोड रेज केल्याचा आरोप करत तिच्या घराच्या इथे येऊन तिच्यावर आणि तिच्या ड्रायव्हरवर लोकं हल्ला करत होते. त्याशिवाय त्यांनी दावा केला होता की रवीनानं मद्यपान केलं होतं आणि ती लोकांसोबत गैरवर्तन करत होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्य समोर आलं आहे. ज्यात रवीनाची कुठेही काही चूक नव्हती. त्यानंतर रवीनानं तिनं मद्यपान केल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीवर 100 कोटींचा मानहानिचा दावा ठोकला होता.