PICS: या अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल

सोशल मीडियात सध्या एका अभिनेत्रीचे फोटोंची जोरदार चर्चा होत आहे. या अभिनेत्रीचं नाव मध्यंतरी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्यासोबतही जुळलं होतं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 10, 2017, 05:47 PM IST
PICS: या अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल  title=
Image: Instagram

नवी दिल्ली : सोशल मीडियात सध्या एका अभिनेत्रीचे फोटोंची जोरदार चर्चा होत आहे. या अभिनेत्रीचं नाव मध्यंतरी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्यासोबतही जुळलं होतं.

होय, ही अभिनेत्री आहे दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलेली राय लक्ष्मी. सध्या सोशल मीडियात तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. राय लक्ष्मी 'जूली २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच राय लक्ष्मीची सोशल मीडियात चर्चा सुरु झाली. राय लक्ष्मीचे अनेक फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

२००४ साली रिलीज झालेल्या अभिनेत्री नेहा धुपियाच्या 'जूली' या सिनेमाचा 'जूली २' हा सिक्वल आहे. 'जूली २' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. सिनेमाच्या टीझरमध्ये राय लक्ष्मीचा चेहरा दाखविण्यात आला नव्हता.

 

The world would be a better place if we all just take a moment to smile. #Miami #happiness 

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

एका तरुणीचा अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास 'जूली २' या सिनेमात दाखविण्यात आला आहे. तसेच अभिनय करण्यासाठी करावा लागणारा संघर्षही या सिनेमात दाखविण्यात आला आहे.

 

Kindness is so gangster

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

या सिनेमात राज लक्ष्मीचा बोल्ड लूक पहायला मिळणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरचं बोलायचं झालं तर सिनेमाची संपूर्ण स्टोरी ही राय लक्ष्मीच्या भूमिकेजवळ फिरत राहते. एक तरुणी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत येते आणि मग तिला विविध परिस्थितींचा सामना करावा लागतो असं या सिनेमात दाखविण्यात आलं आहे.

 

Be a voice not an echo .

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या 'अकीरा' या सिनेमात राय लक्ष्मी गेस्ट अपियरेंसची भूमिका केली होती. २८ वर्षीय रायने १५ वर्षांची असतानाच सिनेक्षेत्रात पाऊल टाकलं होतं. दरम्यान, राय लक्ष्मीचं मधल्याकाळात टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्यासोबत नाव जोडलं गेलं होतं.

काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मी रायने म्हटले होते की, आज इतका वेळ गेला आहे मात्र जेव्हाही धोनीचं नाव येतं तेव्हा माझ्या नावाचा उल्लेख केला जातो. आजही आमच्या प्रेमाच्या अफवा उडल्या जातात.