Film Producer Nitin Manmohan Passes Away: टुनिशा शर्माच्या (Tunisha Sharma Death News) वाईट बातमीनंतर आता बॉलिवूड विश्वातून अजून एक वाईट बातमी समोर येते आहे. सुप्रसिद्ध निर्माते नितिन मनमोहन (Nitin Manmohan Heart Attack) यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. त्यांचे वय 62 वर्षांचे होते. त्यांना याआधीही याच महिन्यात हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. परंतु त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्यानं मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाले आहे. सलमान खानच्या (Salman Khan) मोठ्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्या निधनानं सगळीकडेच शोक व्यक्त केला जातो आहे. त्यांच्या निधनामुळं एक चांगला निर्माता बॉलिवूडकरांनी गमावला आहे. (Ready and Bol Radha Bol fame producer Nitin Manmohan passes away in mumbai)
4 डिसेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा त्यांना तातडीनं कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती तेव्हा गंभीर होती त्यातून ते बरे झाले परंतु त्यांना दुसऱ्यादा हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती कळते आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते मनमोहन (Nitin Manmohan Father) यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी 'बोल राधा बोल', 'लाडला', 'चल मेरे भाई' 'रेडी' 'दस' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या वडिलांनी 'ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना' या चित्रपटांमध्ये काम करते आहे.
नितिन मनमोहन यांची कारकीर्द फार मोठी आहे. नितिन यांचा मित्र कलीम खान यांनी समाजमाध्यमांतून नितिन यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळीकडेच शोक व्यक्त केला गेला आहे. बॉलिवूड हिंदी चित्रपटसृष्टीनं अनेक चांगले कलाकार गेल्या दोन वर्षात गमावले आहेत त्यामुळे आता नितिन यांच्या निधनाच्या बातमीमुळं सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. कलीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार ते गेले 15 दिवस व्हेंनटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. त्यांचे निधन हार्ट अटॅकनं झाले असल्याचे त्यांचे मित्र कलीम खान यांनी कन्फर्म केले आहे.
त्यांच्या मागे त्यांनी पत्नी डॉली आणि दोन मुलं सोहम आणि प्राची आहेत. त्यांच्यावर लवकरच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दिवानगी, सब कुशल मंगल, गली गली चोर हैं, रेडी (Ready), क्रेझी मॅड लव्हर, तथास्तु, टॅन्गो चार्ली, रूद्राक्ष, भूत, लव्ह के लिए कुछ भी करेगा, चल मेरे भाई, दस, आर्मी अशा काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे.