'सिलसिला'च्या निमित्ताने रेखाकडून पुन्हा प्रेमाची कबुली, 'वो मेरा प्यार हैं'

 तर माधुरीने जया बच्चन यांच्या पात्रात प्रवेश करत आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. या व्हिडिओच्या शेवटी रेखा म्हणतात, 'तो माझं प्रेम आहे.'

Updated: Jul 16, 2021, 07:20 PM IST
 'सिलसिला'च्या निमित्ताने रेखाकडून पुन्हा प्रेमाची कबुली, 'वो मेरा प्यार हैं' title=

मुंबई : 'डान्स दीवाने 3'च्या मंचावर या आठवड्यात अभिनेत्री रेखा यांची ग्रॅण्ड एन्ट्री होणार आहे. यावेळी धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने जया बच्चन यांचा सिलसिला सिनेमातील हिट सीन रिक्रिएट केला आहे. रेखा आणि माधुरी यांनी डान्स दीवानेच्या मंचावर हा सीन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर केला आहेत. त्याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

'डान्स दीवाने 3'च्या मंचावर या आठवड्यात प्रेम रंग उधळले जाणार आहेत. एव्हरग्रीन ब्युटी रेखा स्पर्धकांसोबत धम्माल करताना दिसणार आहेत.

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

या आठवड्याचे एकापेक्षा एक असे जबरदस्त प्रोमो समोर आले आहेत. त्यातील एका प्रोमोमध्ये रेखा आणि माधुरी यांनी सिलसिला सिनेमातील हिट सीन सादर केला आहे. रेखा आपले डायलॉग बोलताना दिसत आहेत. तर माधुरीने जया बच्चन यांच्या पात्रात प्रवेश करत आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. या व्हिडिओच्या शेवटी रेखा म्हणतात, 'तो माझं प्रेम आहे.'

डान्स दिवानेच्या फॅन्सना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा हा एकत्र शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात जया बच्चन यांनी रेखासोबत स्क्रिन शेअर केली होती.

या डान्स शोच्या सेटवरील अनेक फोटो समोर आले आहेत. एका फोटोमध्ये रेखा माधुरी दीक्षितला किस करताना दिसत आहेत. बॉलिवूडच्या या दोन ग्लॅमरस डीवा एकत्र आल्याने मंचावर आणखीनच बहर आला आहे.