Amitabh Bachchan यांच्यामुळे रेखा अडचणीत? 'हा' हट्ट करणं पडलं महागात

Amitabh Bachchan आणि रेखा हे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच काय तर लग्न करणार होते असेही म्हटले जातं होत. मात्र, जया बच्चन यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले नाही. 

Updated: Nov 29, 2022, 06:27 PM IST
Amitabh Bachchan यांच्यामुळे रेखा अडचणीत? 'हा' हट्ट करणं पडलं महागात title=

Amitabh Bachchan and Rekha : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची जोडी ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रेखा आणि अमिताभ त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीमुळे नाही तर त्यांच्या ऑफस्क्रिन असलेल्या केमिस्ट्रीमुळेही चर्चेत होते. शूटिंग करत असताना ते एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा ही सुरु झाल्या. दरम्यान, एकवेळ अशी होती जेव्हा अमिताभ यांच्यासोबत वेळ व्यथित करण्यासाठी रेखा यांनी सेटवर एक केला हा हट्ट.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण ‘कारनामा’ (Karnama) या चित्रपटाच्या सेटवर झालं होतं. या चित्रपटाचे निर्माते हे त्या काळातील लोकप्रिय खलनायक रणजीत (Ranjeet) हे होते. या चित्रपटात मुख्य भूमिका रेखा साकारत होत्या. त्यावेळी अमिताभ आणि रेखा रिलेशनशिपमध्ये(Amitabh Bachchan and Rekha Relationship) असल्याचे म्हटले जात होते. तर अमिताभ यांच्यासोबच संध्याकाळी वेळ व्यथित करण्यासाठी रेखा यांनी एक शक्कल लढवली होती.  

हेही वाचा : Prabhas आणि Kriti च्या चाहत्यांसाठी Good News! लवकरच उरकणार साखरपुडा?

जेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरु होते तेव्हा रेखा यांना संध्याकाळच्या शिफ्टमध्ये बोलावले आणि त्यावेळी त्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. चित्रपटाचे क्रू आणि त्यांच्यासोबत रणजीत यांनी रेखा यांना समजवण्याच्या प्रयत्न केला तेव्हा रेखा यांनी कोणाचेही ऐकले नाही. (rekha got in trouble because of amitabh bachchan got fired from movie)  

दरम्यान, रेखा ऐकत नाही हे पाहताच रणजीत यांनी मुख्य अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्याशी यावर चर्चा केली. या चर्चे दरम्यान, धर्मेंद्र यांनी रणजीत यांना सल्ला दिला की रेखा ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करा. त्यानंतर चित्रपटात तब्बूची बहीण फराह नाजला (Farah Naaz) कास्ट करण्यात आले आणि रेखा यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. (Tabu's Sister Farah Naaz)