रेखा कधीही विसरू शकणार नाहीत बिग बींसोबतची 'ती' शेवटची भेट

बिग बी आणि रेखा यांच्या शेवटच्या भेटीबद्दल तुम्हाला माहिती आहे?  

Updated: Oct 1, 2022, 04:03 PM IST
रेखा कधीही विसरू शकणार नाहीत बिग बींसोबतची 'ती' शेवटची भेट

मुंबई : बॉलिवूडमध्ये काही कपल (Bollywood Couple) असे होते, ज्यांनी अर्ध्यात एकमेकांची साथ सोडली, पण आजही त्यांच्या प्रेमाचे किस्से चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच कपलपैकी एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि अभिनेत्री रेखा (Rekha). रेखा. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचे हे प्रसिद्ध कलाकार एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडाले होते. पण काही बंधनांमुळे दोघांना कायमच विभक्त व्हावं लागलं. बिग बींपासून विभक्त झाल्यानंतर रेखा यांचं नाव अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत जोडण्यात आलं पण रेखा यांच्या नशीबात यावेळीही निराशा होती. (Rekha with raj babbar after breakup with amitabh bachchan)

बिग बींसोबत ब्रेकअप झाल्यांनंतर रेखा फार निराश होत्या. तेव्हा विभक्त झाल्यानंतर दोघे कधी सिनेमांमध्येही एकत्र दिसले नाहीत.  आज बिग बी त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहेत, तर दुसरीकडे रेखा आजही एकट्या आहेत. रेखा आणि अमिताभ यांनी दहा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. तेव्हा त्यांच्या जोडीला चहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. (amitabh bachchan and rekha together)

आज देखील त्यांच्या प्रेमाचे किस्से इंडस्ट्रीच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंजत असतात. असाच एक किस्सा 'मुकद्दर का सिकंदर' सिनेमाशी संबंधित आहे. या सिनेमानंतर खुद्द अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत काम करण्यास नकार दिला होता. (Rekha meeting with amitabh bachchan)

ही गोष्ट जेव्हा रेखा यांना समजली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रेखा यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं. अमिताभ यांनी प्रत्येक निर्मात्याला मी रेखा यांच्यासोबत काम करणार नाही असं सांगितलं. पण बिग बींनी ही गोष्ट स्वतःहून रेखा यांना सांगितली नव्हाती. 

त्यानंतर रेखा यांनी या गोष्टीची विचारणा बिग बींकडे केली. तेव्हा बिग बींनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. तेव्हा ही जोडी शेवटी ऑनस्क्रिन दिसली. त्यानंतर ही जोडी फक्त त्या  10 सिनेमांसाठी मर्यादीत राहिली. (amitabh bachchan and rekha together 10 films) 

रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी 'दो अनजाने' सिनेमामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. त्यावेळी अमिताभ मोठे स्टार होते, तर रेखा हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन होत्या.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेल्या रेखा यांनी 'दो अनजाने' सिनेमातून पदार्पण केलं. सिनेमात रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी इतकी हीट ठरली की निर्मात्यांनी रेखा आणि बिग बींसोबत  9 सिनेमांमध्ये काम केलं.