मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं पहायला मिळत आहे.
आतापर्यंत जिओच्या ग्राहकांची संख्या १६ कोटींवर पोहोचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने २३ डिसेंबर रोजी यासंदर्भात माहिती दिली आहे. या कार्यक्रमात आकाश आणि ईशा अंबानीसोबत अभिनेता शाहरुख खानही उपस्थित होता.
And with a night filled with fun, joy and celebrations, we continue the journey. #RIL40 pic.twitter.com/wephzryNmp
— Reliance Jio (@reliancejio) December 23, 2017
मात्र, कार्यक्रमादरम्यान अभिनेता शाहरुख खान याच्याकडून एक मोठी चूक झाली आणि ही चूक आकाशने लक्षात आणून दिली.
#RIL40 https://t.co/Z1aPl4eTr0
— Reliance Jio (@reliancejio) December 23, 2017
या कार्यक्रमात बोलताना अभिनेता शाहरुख खान याने म्हटलं की, जिओच्या ग्राहकांची संख्या आतापर्यंत १० कोटींवर पोहोचली आहे. त्यानंतर लगेचच आकाशने अभिनेता शाहरुखला आठवण करुन दिली की, '१६ कोटी शाहरुख'.
It began with a spark of passion to serve India. Here’s Akash, Isha and Anant keeping the flame alive along with Smt. Kokilaben ji. #RIL40 pic.twitter.com/ekrErToYnP
— Reliance Jio (@reliancejio) December 23, 2017
रिलायन्स जिओने सप्टेंबर २०१६मध्ये आपल्या ४जी सेवेची सुरुवात केली. कंपनीची वॉईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा संपूर्णपणे मोफत आहे. रिलायन्स जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजला ४० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने २३ डिसेंबर रोजी रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हजारो कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी आपल्या आगामी योजनांवर प्रकाश टाकला.