धक्कादायक! रिंकू राजगुरुचा लूक पाहून चाहते हैराण

रिंकूचा अचानक हा लूक पाहून सगळेच हादरले.

Updated: Jun 7, 2022, 01:34 PM IST
धक्कादायक! रिंकू राजगुरुचा लूक पाहून चाहते हैराण title=

मुंबई : सैराटमधील आपल्या भूमिकेनं प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरूचा आता नवा सिनेमा येतोय. स्वत: रिंकूने आपल्या सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. मात्र सिनेमा रिलीज आधीच रिंकू राजगुरुने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. रिंकूचा भयानक चेहरा पाहून तिचे चाहते तिची चिंता व्यक्त करत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोत रिंकू एसिड हल्याच्ची बळी झाल्याचं दिसत आहे.  

पण आम्ही तुम्हाला सांजू ईच्छितो की, रिंकूचा आगामी सिनेमा 'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमात रिंकू  एसिड हल्ल्याची बळी असलेली भूमिका साकारतेय. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँन्चिंग सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या ट्रेलर लाँन्चिंगला अभिनेत्री थेट याच लूकमध्ये पोहचली. रिंकूचा अचानक हा लूक पाहून सगळेच हादरले. पण हा तिचा लूक सिनेमात आहे.  त्यामुळे तिच्या चाहत्यांना काळीजीच काहीच कारण नाही.

आठवा रंग प्रेमाचा या सिनेमाचं दिग्दर्शन खुशबू सिन्हा करत आहेत. त्यांचा हा पहिलाच चित्रपट असल्याचं कळतंय. याशिवाय समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सिनेमात रिंकूसोबतच मकरंद देशपांडेही मुख्य भूमिका साकारणार आहेत. शिवाय विशाल आनंद हा या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. रिंकू नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी रिंकू नेहमी काहीना काही पोस्ट शेअर करते. नेहमी चर्चेत असणारी रिंकू राजगुरु यावेळी मात्र जरा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. आणि हे कारण दुसरं तिसरं नसून तिचा आगामी सिनेमा आहे.  हा सिनेमा १७ जून २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.