मुंबई : झी टीव्हीवरील डान्स इंडिया डान्स हा रियालिटी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले. त्यातील स्पर्धक तर एकाहून एक सरस आहेत. तसंच या शो मध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाच्या किंवा कार्यक्रमाच्या प्रमोशन्ससाठी उपस्थित राहतात. पुढच्या भागात सुपरहिट मराठी चित्रपट सैराटमधील कलाकार प्रमुख पाहूणे म्हणून येणार आहेत.
नुकतेच चित्रपटातील कलाकार रिंकू राजगुरू, तानाजी गालगुंडे आणि अरबाझ शेख यांनी या शो साठी शूटिंग केले. स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून त्यांना प्रोत्साहन दिले. हा अनुभव त्यांच्यासाठी फारच खास होता.
तर हा अनुभव रिंकूसाठी स्वप्नपूर्ती करणारा ठरला. रिंकू म्हणते, मी शाळेत असल्यापासून डान्स इंडिया डान्स हा शो पाहते. या शो ची मी जबरदस्त फॅन असून स्पर्धक साकारत असलेले परफॉर्मन्स मला अतिशय आवडतात. मिथुनदांना एकदा भेटून त्यांच्यासोबत डान्स करण्याचे माझे स्वप्न होते. आमच्यासाठी ते देशातील अल्टिमेट डिस्को डान्सर आहेत. त्यांच्यासोबत डान्स करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. माझ्यासाठी हा दिवस खूपच स्पेशल ठरला.”
इतकंच नाही तर मिथुनदांसोबत रिंकूचे नाचण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या सर्वांनी सैरामधील झिंगाटवर मस्त ताल धरला.