आर्चीच्या साडीतील अदांनी तरुण घायाळ... म्हणाले आर्ची एकच नंबर, फोटोवर लाईक्स, कमेन्टसचा पाऊस

'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून एका रत्रीत प्राकाशझोतात अलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. 

Updated: May 16, 2021, 03:35 PM IST
आर्चीच्या साडीतील अदांनी तरुण घायाळ... म्हणाले आर्ची एकच नंबर, फोटोवर लाईक्स, कमेन्टसचा पाऊस title=

मुंबई : 'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून एका रत्रीत प्राकाशझोतात अलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. चित्रपटातील तिच्या आर्चीच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलचं  डोक्यालर घेतलं. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. एवढंच नाही  तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. सध्या रिंकूने पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

फोटोमध्ये  तिने साडी नेसली आहे. तिच्या पारंपरिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. साडीतल्या तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेन्ट्स आणि लाईक्सचा पाऊप पडत आहें. एका चाहत्यांने तिच्या फोटोवर 'एकचं नंबर दिसतेय...', तर दुसऱ्या चाहत्याने 'झिंगाट' असं लिहिलं आहे. रिंकूने पहिल्यांदा साडीताल फोटो पोस्ट केले नाहीत, याआधी देखील तिच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं होतं.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर,  ती अभिनेत्री लारा दत्तासोबत 'हंड्रेड' या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या  सीरिजमध्ये तिने एका मराठी मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर रिंकू आता 'झुंड' चित्रपटात देखील दिसणार आहे. चित्रपटात ती  अभिनेता आकाश ठोसरसोबत दिसणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन देखील दिसणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी नागराज मंजुळे यांच्या खांद्यावर आहे.