मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
रणबीरला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे आई - बाबा, म्हणजेच नीतू सिंग आणि ऋषी कपूर पुढे सरसावले आहेत. दोघांनीही रणबीरला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
रणबीर कपूरची ओळख 'मम्माज बॉय' अशीदेखील आहे. नीतू सिंगनीही त्याच्या मुलाचे कौतुक करत एक खास फोटो शेअर केला. सोबतच रणबीर कपूरच्या फॅन क्लब्समधून आलेल्या शुभेच्छांनाही आभार दिले आहेत.
ऋषी कपूर यांनीदेखील रणबीरला शुभेच्छा देण्यासाठी खास ट्विट केले. रणबीरसाठी खास मेसेज नसला तरीही आजचा (२८ सप्टेंबर) दिवस ऋषी कपूरजींसाठी थोडा अजून खास आहे. ४४ वर्षांपूर्वी ऋषी कपूरचा 'बॉबी' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने ऋषी कपूर यांना हिंदी सिनेसृष्टीत विशेष ओळख दिली. आजही त्यांची ओळख 'बॉबी' या नावाने होते. हा चित्रपट माझा पुर्नजन्म असल्याचे ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये लिहले आहे.
28th September Birthdays. Bhagat Singh ji Lata Mangeshkar ji: Rima Jain: Ranbir Kapoor. Second life of mine, 44 years back, "Bobby"released!
— Rishi Kapoor (@chintskap) September 27, 2017
इम्तिाज अली, शाहरुख खान, आमिर खान, आलिया भट्ट, अनुराग बस्सू, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जौहर, अर्जुन कपूर आदि अनेक बॉलिवूड स्टार्सनी रणबीरच्या पार्टीमध्ये सहभाग घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या.