फक्त शमिता-राकेशच्या आधी 'बिग बॉस'च्या घरात या जोडप्यांचा रंगला रोमान्स

बिग बॉसच्या घरात रंगतो रोमान्स, बाहेर येताचं सर्वत्र फक्त ब्रेकअपच्या चर्चा

Updated: Aug 27, 2021, 09:16 AM IST
फक्त शमिता-राकेशच्या आधी 'बिग बॉस'च्या घरात या जोडप्यांचा रंगला रोमान्स  title=

मुंबई : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसची चर्चा आहे. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बाबटने. शमिता-राकेश ही पहिली जोडी नाही ज्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा वाऱ्यासारखी रंगत आहे. या आधी देखील घरात अनेक जोडप्यांचा रोमान्स रंगला. या वादग्रस्त शोमध्ये अनेक जण फक्त या जोडप्यांसाठी बॉस पाहात असतात. असे कोणते जोडपे आहेत, ज्यांची चर्चा आजही होत असते. 

अभिनेत्री शमिता शेट्टी- अभिनेता राकेश बापट

​Shamita Shetty and Raqesh Bapat

अभिनेत्री पवित्रा पुनिया - अभिनेता एजाज खान

Eijaz Khan and Pavitra Punia

 पवित्रा आणि  एजाज आजही एकत्र आहे. 'बिग बॉस 14' यांची ओळख झाली. आज दोघे एकमेकांना डेट करतात. शोमधील गैरसमज आणि वादानंतर दोघांमध्ये प्रेमाचं गुलाब फुललं.

अभिनेत्री गौहर खान - अभिनेता कुशाल टंडन

Gauahar and Kushal Tondan
गौहर खान आणि कुशाल टंडन यांच्यात 'बिग बॉस 7'मध्ये रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या. त्यांच्या तयार झालेल्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांमध्ये असलेलं नातं तुटेल असं चाहत्यांना वाटलं. पण बाहेर आल्यानंतरही काही काळ ते एकमेकांना डेट करत होते. पण हे नातं फार काळ काही टिकलं नाही. 

अभिनेत्री तनीषा मुखर्जी - अभिनेता अरमान कोहली

Tanishaa Mukerji and Armaan Kohli
 'बिग बॉस 7'मध्ये यांचा रोमान्स इतका रंगला की त्यांनी शोचा होस्ट सलमान खानने देखील यांना चेतावणी दिली. 

अभिनेत्री करिश्मा तन्ना - अभिनेता उपेन पटेल

Karishma Tanna and Upen Patel
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा तन्ना आणि अभिनेता उपेन पटेल यांच्या नात्याची चर्चा रंगली. घरातून बाहेर आल्यानंतर काही दिवस ते एकत्र होते. पण अखेर काही दिवसांनी दोघे विभक्त झाले. 

अभिनेत्री सारा खान - अभिनेता अली चर्चेंट

Sara Khan and Ali Merchant
गायक आणि अभिनेत्री सारा खान आणि अभिनेत्री अली मर्चंट यांनी शोमध्येचं लग्न केलं. पण हे लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही.