Indian Idol 12 : पवनदीपचा कियारासोबत रोमान्स; सिद्धार्थ आणि अरूणिता एक टक पाहातच राहीले

सर्वत्र फक्त आणि फक्त पवनदीप आणि कियाराच्या रोमान्सची चर्चा; पाहा व्हिडिओ   

Updated: Aug 12, 2021, 10:08 AM IST
Indian Idol 12 : पवनदीपचा कियारासोबत रोमान्स; सिद्धार्थ आणि अरूणिता एक टक पाहातच राहीले

मुंबई : सिंगिंग रियलिटी शो (Singing Reality Show), इंडियन आयडल 12 ची  (Indian Idol 12) सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली असते. महत्त्वाचं म्हणजे शो आता अंतिम टप्प्यावर येवून पोहोचला आहे.  15 ऑगस्ट रोजी शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 15 ऑगस्ट निमित्ताने मोठा कार्यक्रम होस्ट करण्यात आला आहे. तब्बल 12 तास चालणाऱ्या या ग्रँड फिनॅलेमध्ये संगीत विश्वातील अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थिती राहणार असून, अनेक धमाकेदार पफॉर्मेंस प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. 

इंडियन आयडल 12 ची ट्रॉफी कोणाच्या नशिबात आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  पवनदीप राजन (Pawandeep Rajan), अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal), मोहम्मद दानिश (Mohammad Danish), सायली कांबळे (Sayli Kamble), शनमुखप्रिया (Shanmukhapriya) आणि निहाल तारो (Nihal Tauro) यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंडियन आयडल 12 ग्रँड फिनॅलेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यांमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा देखील उपस्थित राहणार आहे. यावेळी पवनदीपने कियारासोबत ठेका धरला. त्यांची केमेस्ट्री पाहून सिद्धार्थ त्यांच्याकडे पाहातंच राहीला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पार्श्वसंगीतासाठी पवनदीप तयार 
सांगायचं झालं तर पवनदीप 2015 साली 'द वॉयस' शोचा विजेता ठरला होता. आता इंडियन आयडलमध्ये येण्याचं  कारण वियजी होणे नव्हतं तर नवं काही तरी शिकण्याची इच्छा होती. आता पवनदीपला पूर्ण विश्वास आहे की तो पार्श्वसंगीतासाठी तयार झाला आहे.