RRR Sequel : 'आरआरआर' हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी चित्रपटगृहात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं फक्त भारतीयांनाच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही वेड लावलं. चित्रपटातील गाण्याला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. तेव्हा पासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा सुरु होती. आता या चित्रपटाचा सीक्वल लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण अशी चर्चा सुरु आहे की चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी चित्रपटाविषयी हिंट दिली आहे. या चित्रपटाच्या सीक्वलची शूटिंग ही आफ्रिकेत होणार असून त्याचा सेट देखील तिथेच करण्यात येईल असे म्हटले आहे.
विजयेंद्र प्रसाद यांनी RRR च्या सीक्वलनंतर विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, यात होकार नाही किंवा नकारही नाही. नक्की काहीच नाही. 2022 मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मुलाशी मी सीक्वलविषयी काही गोष्टींवर चर्चा करत होतो. या चित्रपटाचं कथानक हे आफ्रीकेतील असेल. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की "आरआरआरच्या प्रदर्शनानंतर मी माझ्या मुलासोबत सीक्वल विषयी एक आयड्या शेअर केली. ज्यात सीता ही राम राजू आणि कोमाराम भीम यांच्यासोबत आफ्रिकेत जाते. त्यानी हे देखील सांगितलं की त्यांचा मुलगा आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांना त्यांची आयड्या आवडली आहे आणि त्यांनी या आयड्याला पूर्ण स्क्रिप्टमध्ये बनवण्यास सांगितले.' त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Gadar 2 Trailer : 'गदर 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, मुलाला वाचवण्यासाठी शत्रुशी लढताना दिसेल 'तारा सिंग'
एसएस राजामौली यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहेत. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात दाक्षिणाच्य अभिनेता महेश बाबू दिसणार आहे. त्यानंतरच एसएस राजामौली ही त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष देतील. विजयेंद्र प्रसाद म्हणाले, "मी माझ्या मुलाला ओळखतो, त्यामुळे तो आता सीक्वलच्या आयड्याकडे लक्ष देणार नाही कारण तो सध्या महेश बाबूसोबतच्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. त्या चित्रपटावर त्याचं काम झालं की त्यानंतर तो सीक्वलवर लक्ष केंद्रित करेल. त्यानंतर जर त्याला स्क्रिप्ट आवडली आणि दोघे अभिनेत्यांना देखील ही स्क्रिप्ट आवडेल आणि त्यांच्याकडे वेळ असेल तर या चित्रपटाचा सीक्वेल येईल." त्याआधी दिलेल्या एका मुलाखतीत विजयेंद्र प्रसाद म्हणाले होते की RRR च्या सीक्वलचं दिग्दर्शक हॉलिवूडचा कोणता दिग्दर्शक करू शकतो.