ती जाड झाली म्हणून तिला चिडवणं रडवणं कितपत योग्य, नक्की काय घडलं वाचा

'बिग बॉस 14' विजेती अभिनेत्री रुबिना दिलीक नेहमीच चर्चेत असते.

Updated: Nov 23, 2021, 02:39 PM IST
ती जाड झाली म्हणून तिला चिडवणं रडवणं कितपत योग्य, नक्की काय घडलं वाचा title=

मुंबई : 'शक्ति' टीव्ही शो फेम आणि 'बिग बॉस 14' विजेती अभिनेत्री रुबीना दिलैक नेहमीच चर्चेत असते. अभिनयासोबतच रुबीना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना प्रभावित करत असते.

रुबीनाही तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. लॉकडाऊनमध्ये रुबीनाचे वजन खूप वाढलं आहे. तिचं हे वाढलेलं वजन  चाहत्यांना आवडत नाहीये. त्यामुळेच तिला सोशल मीडियावरही काही दिवसांपासून प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्याचबरोबर रुबीनाने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. रुबीनाने एक नोट शेअर करून सर्वांसमोर आपला मुद्दा मांडला आहे.

रुबीना दिलैकने ट्विटरवर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, 'माझ्या प्रिय शुभचिंतकांनो, मी खूप दिवसांपासून पाहतेय की, माझं वाढलेलं वजन तुम्हाला त्रास देत आहे. तुम्ही  मला सतत द्वेषपूर्ण मॅसेज  पाठवत आहात.  तुम्ही माझा चाहते रहाणार नाही असं तुम्ही मला धमकावत आहात की 'मी जाड आहे,  चांगले कपडे घालत नाही आणि मोठे प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी मेहनत करत नाही.

 

रुबीना दिलैकची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. या पोस्टमधून स्पष्ट होतय की, युजर्सच्या ट्रोलिंगमुळे ती प्रचंड संतापली आहे. त्याचबरोबर रुबीना दिलैकच्या या पोस्टवर चाहत्यांच्या सतत कमेंट येत आहेत. दुसरीकडे, कमेंट करून चाहते नेहमी तिच्यासोबत असल्याबद्दलही बोलत आहेत. रुबीनाचे चाहते लिहितात की, तू जशी आहेस तशीच आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. रुबीनाच्या पोस्टवर अशा सगळ्या कमेंट देखील येत आहेत.