Priyanka-Nick Wedding: प्रियांकाचा 'ड्रिम लेहंगा' डिझाईन करणार...

लग्नसराईचे वारे सध्या संपूर्ण कलाविश्वात वाहत आहेत.   

Updated: Oct 31, 2018, 11:32 AM IST
Priyanka-Nick Wedding: प्रियांकाचा 'ड्रिम लेहंगा' डिझाईन करणार...

मुंबई : लग्नसराईचे वारे सध्या संपूर्ण कलाविश्वात वाहत आहेत. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी लग्न करत त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. 
यंदाच्या वर्षाचा शेवटही असाच लग्नसराईच्या वातावरणात होणार आहे. कारण आहेत दोन बहुप्रतिक्षित लग्न. अभिनेत्री दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा- निक जोनास या जोड्या लग्नगाठ बांधण्यासाठी तयार झाल्या आहेत. 

प्रियांका आणि दीपिका या दोन्ही अभिनेत्रींच्या लग्नाच्या तयारीविषयी रोज नवी माहिती समोर येत आहे. सध्या अशीच एक रंजक माहिती अनेकांचच लक्ष वेधत आहे. 

खरंतर लग्नाच्या दिवशी प्रियांकाच्या स्वप्नवत लेहंग्याविषयीच्या या चर्चा आहेत असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वी असं म्हटलं जात होतं की प्रियांका लग्नाच्या दिवशी अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनर जोडीनेच डिझाईन केलेला लेहंगा परिधान करु शकते. 

पण, आता मात्र काही वेगळीच माहिती समोर येत आहे. एका प्रसिद्ध संकेतस्थळाच्या वृत्तानुसार प्रियांका लग्नाच्या दिवशी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या डिझाईनला पसंती देणार आहे. 

अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासोबत जवळपास सहा तासांच्या चर्चेनंतर प्रियांकाच्या लग्नाच्या वेळी हीच जोडी तिचा लेहंगा डिझाईन करणार अशा चर्चा होत्या. पण, ते संगीत सोहळ्यासाठी 'देसी गर्ल'ला सुरेख लेहंगा देणार आहेत. तर, लग्नाच्या दिवशी प्रियांका 'सब्यसाची ब्राईड'च्याच रुपात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

तीन दिवसांच्या दिमाखदार सोहळ्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.