close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इन्स्टाग्रामवर प्रभासची दणक्यात एन्ट्री; 'हे' आहे त्याच्या अकाऊंटचं नाव

अकाऊंट सुरु करताच फॉलोअर्सचा आकडा पोहोचला.... 

Updated: Apr 15, 2019, 07:23 PM IST
इन्स्टाग्रामवर प्रभासची दणक्यात एन्ट्री; 'हे' आहे त्याच्या अकाऊंटचं नाव
प्रभास

मुंबई : अनेक तरुणींच्या काळजाचा ठोका चुकवणारा अभिनेता प्रभास आता एका नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इथे त्याच्या कोणा एका आगामी चित्रपटाची चर्चा होत नसून, विषय सुरू आहे सोशल मीडियाच्या आणखी एका माध्यमाला प्रभासने आपलंसं केल्याचा. 'साहो' या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र असणारा हा 'बाहुबली' फेम अभिनेता आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभासने नुकतच इन्स्टाग्रामच्या वर्तुळात मोठ्या उत्साहात प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काळात इन्स्टा स्टोरी आणि विविध पोस्टच्या माध्यमातून प्रभासला आणखी चांगल्या पद्धतीने ओळखण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

'अॅक्टर प्रभास' असं त्याच्या अकाऊंटचं नाव असून, प्रभासच्याच नावे ते अकाऊंट सुरू करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्याने अद्यापही या अकाऊंटवरुन कोणताच फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही इन्स्टा स्टोरी शेअर केलेली नाही. पण, तरीही त्याच्या फॉलोअर्सचा आकडा हा सात लाखांहूनही अधिक झाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रभासची इन्स्टाग्रामवर दणक्यात एन्ट्री झाली असं, म्हणायला हरकत नाही.  

एकिकडे प्रभासच्या आगामी 'साहो' या चित्रपटाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे त्याने असं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करणं, ही म्हणजे चाहत्यांसाठी एक परवणीच आहे. प्रभास इन्स्टाग्रामवर नेमकी पहिली पोस्ट कधी आणि कोणती करणार याविषयीसुद्धा अनेकांनाच उत्सुकता लागली आहे. शिवाय तो कोणाला फॉलो करणार, त्याला कोणते कलाकार फॉलो करणार हे पाहण्यासाठीही रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्याचा हा इन्स्टा अंदाज त्याला फळणार का, हेसुद्धा येता काळच ठरवणार आहे. 

इन्स्टाग्रामवर पदार्पण करणारा प्रभास येत्या काळात 'साहो' या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये तो अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सुजिथ दिग्दर्शित 'साहो'च्या निमित्ताने ये दोन्ही चेहरे प्रथमच स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे कलाविश्वात एका नव्या ऑनस्क्रीन जोडीची भर पडली असंच म्हणावं लागेल.