फोटोज : सैफचे बर्थडे सेलिब्रेशन

सैफच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज व्हायरल होत आहेत.

Updated: Aug 16, 2018, 12:53 PM IST
फोटोज : सैफचे बर्थडे सेलिब्रेशन title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वयात अजून एका वर्षाची भर पडली आहे. आज सैफचा ४८ वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस सैफने पत्नी करिना कपूर आणि मुले सारा-इब्राहिम यांच्यासोबत साजरा केला. सैफच्या बर्थडे पार्टीला बहिण सोहा अली खान, पती कुणाल खेमू देखील उपस्थित होते. सैफच्या बर्थडे पार्टीचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

Happy birthday saifu !  #birthdaytime #family #friends #love #letscelebrate #happybirthday

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

या पार्टीचे फोटोज सोहा अली खान आणि करिश्मा कपूरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सैफच्या वर्थडे केकवर व्ही लव्ह यू सैफू, असे लिहिले आहे. पार्टीच्या ग्रुप फोटोमध्ये करिना, इब्राहिम, सारा, करिश्मा, कुणाल खेमू, सोहा अली खान दिसत आहेत. पण फेमस स्टार किड तैमूर दिसत नाही.

 

Happy birthday !!

A post shared by Soha (@sakpataudi) on

सैफ आणि करिना दोघेही सोशल मीडियापासून दूर असले तरी १५ ऑगस्टला सैफची मुलगी सारा अली खानने इंस्टाग्रामवर एंट्री केली आहे आणि वडीलांचे बर्थडे फोटोज इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. 

 

Happy happy birthday dearest Saif 

A post shared by Poonam Damania (@poonamdamania) on