मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या 'सिने' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक असून त्यामध्ये परिणीती सायनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 26 मार्च 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलयं.
टीझरची सुरुवात, बॅडमिंटन कोर्टात सुरू होत आहे, जिथे परिणीती तिच्या खांद्यावर तिरंगा घेताना दिसत आहे. यानंतर परिणीती सराव करताना दिसतेय. टीझरमध्ये परिणीतीच्या आवाजात एक संवाद ऐकू आला, ज्यामध्ये ती म्हणते, 'सामने कोई भी हो में तो बस मार दुंगी'या सिनेमाच्या टीझर नंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पहायला मिळतेय
या चित्रपटाची निर्मिती बर्याच दिवसांपासून सुरू आहे. परिणीतीने अनेक वेळा बॅडमिंटनचा सराव करणारे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. सुरुवातीला या चित्रपटात श्रद्धा कपूर सायना नेहवालची भूमिका साकारणार होती.
तिने चित्रपटाची तयारीही सुरू केली होती, परंतु काही काळानंतर तिला डेंग्यू झाला, ज्यामुळे शूटिंग थांबली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा खूप व्यस्त होती .यामुळेच, तिने हा सिनेमा सोडला असावा अशी चर्चा आहे. यानंतर या चित्रपटात परिणीती चोप्राला कास्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे परिणीती चोप्राने 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटाद्वारे डिजिटल पदार्पण केले आहे. हा चित्रपट गेल्या महिन्यात 26 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. परिणीतीच्या या चित्रपटाच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
परिणितीशिवाय या चित्रपटात अदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी आणि अनिवाश तिवारी सारख्या कलाकारही झळकले होते... परिणीतीच्या आगमी सिनेमा सिने साठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक असल्याचं पहायला मिळतंय.