Saira Banu Admitted: सायरा बानो यांची प्रकृती चिंताजनक

अभिनेत्री सायरा बानो हिंदुजा रूग्णालयात दाखल 

Updated: Sep 1, 2021, 01:45 PM IST
Saira Banu Admitted: सायरा बानो यांची प्रकृती चिंताजनक title=

मुंबई : अभिनेत्री सायर बानो यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना तीन दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्त दाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती अद्याप ठिक नसल्यामुळे सायरा बानो यांना ICU मध्ये हलवण्यात आलं आहे. 

सायरा बानो यांची ऑक्सिजनची पातळी देखील कमी होत आहे. ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. गेल्या 54 वर्षांपासून दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत आयुष्य जगत असलेल्या सायरा बानो यांची प्रकृती अचनाक खालावली आहे. चिंता करण्याची काही गरज नाही. पण काही दिवस त्यांना रूग्णालयात राहावं लागणार आहे. 

सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 साली मसुरीत झाला. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलंय. सायरा बानो यांनी 1966 साली आपल्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान दिलीप कुमार यांचं निधन 7 जुलै रोजी झालं. तेव्हा सायरा बानो यांनी मोठा धक्का बसला. 

पतीच्या मृत्यूनंतर सायरा बानो म्हणाल्या की, 'देवाने माझ्याकडून माझ्या जगण्याची आशा हिरावूण घेतली... त्यांच्या शिवाय मी कोणत्या गोष्टीचा विचार देखील करू शकत नाही...'