मुंबई : 'सैराट' या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि यावेळी चर्चा आहे तिच्या ग्लॅमरस लूकची. सैराट या सिनेमात नॉन अॅक्टर असतानाही तिने उमटवलेला ठसा हा कौतुकास्पद आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेने मराठीतील स्त्री अभिनेत्रीची व्याख्याच रिंकूच्या माध्यमातून बदलून टाकली. पण आता रिंकू या ग्लॅमरस जगतासाठी सज्ज झाली आहे.
सैराटच्या अभुतपूर्व यशानंतर रिंकू राजगुरूला घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं. तिचं शिक्षण तिने वेगळ्यापद्धतीने पूर्ण केलं. सैराटनंतर आता रिंकू राजगुरू मकरंद माने दिग्दर्शित 'कागर' या सिनेमातून 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पोस्टर रिलीज झाला आहे.
रिंकूने आता आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत. यावरून तिचा झालेला मेकओव्हर प्रत्येकालाच भावला आहे. या अगोदरची तिने बरंच वजन कमी केल्याचं देखील समोर आलं होतं.
सैराट सिनेमातील आर्ची ही सिनेमातील नायक होती. तिचं ट्रॅक्टर चालवणं, कॉलेजमध्ये कुणाच्या कानाखाली वाजवणं, प्रसंगी हातात बंदूक घेणं या सगळ्यामुळे ती महाराष्ट्राची लाडकी बनली. पण आता रिंकू आपल्या अंदांनी महाराष्ट्राला घायाळ करणार आहे.
रिंकुचे अनेक नवीन फोटो सोशल मीडियावर पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की तिने तिचे वजन ही कमी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिंकु आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.
सध्या नवनवीन अंदाजातले ग्लॅमरस फोटो रिंकु सोशल मीडियावर शेअर करत असून तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे.