वाजपेयींच्या निधनावर 4 दिवसानंतर सलमानचं ट्विट, लोकांकडून ट्रोल

ट्विटमध्ये सलमानने केली चूक

Updated: Aug 22, 2018, 02:51 PM IST
वाजपेयींच्या निधनावर 4 दिवसानंतर सलमानचं ट्विट, लोकांकडून ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याचा सिनेमा भारतच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. माल्टामध्ये त्याच्या सिनेमाचं शूटींग सुरु आहे. कॅटरिनाने देखील आता तेथे पोहोचली आहे. 16 ऑगस्टला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. बॉलिवूडसह देश-विदेशातून देखील श्रद्धांजली वाहण्यात आली.

सलमान खानने देखील वाजपेयींना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. सलमानने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, खरच अटलजी एक महान नेते होते. उत्कृष्ठ नेता, वक्ता आणि सामान्य व्यक्तीमत्व गमवल्यानंतर खूप दु:ख होत आहे. पण सलमानने त्याच्या या ट्विटमध्ये एक चूक केली.

सलमानने Feelingच्या ऐवजी Feeing असं लिहिलं. यामुळे देखील सलमान खानला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.