सलमान खानच्या सल्लामुळे बदललं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य, स्वत: सांगितला तो किस्सा

अभिनेत्याच्या आयुष्यात एक अशी वेळ आली होती, जेव्हा त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते.

Updated: Sep 22, 2021, 07:24 PM IST
सलमान खानच्या सल्लामुळे बदललं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य, स्वत: सांगितला तो किस्सा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलने हिंदी चित्रपटसृष्टीत 'बरसात' चित्रपटातून पदार्पण केले. त्याचे सुरुवातीचे काही चित्रपट खूप गाजले, पण नंतर त्याच्या करिअरचा आलेख खाली घसरू लागला. अभिनेत्याच्या आयुष्यात एक अशी वेळ आली होती, जेव्हा त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. ज्यामुळे तो चित्रपट सुष्टीतून पूर्णपणे गायब झाला. परंतु त्यानंतर काही वर्षांनी सलमान खानने त्याला एक सल्ला दिला, ज्यामुळे बॉबी देओलचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

बॉबी देओलने दिलेल्या मुलाखतीत सलमान खानशी संबंधित ही गोष्ट उघड केली. मुलाखतीत सलमान खानबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, "मी निर्मात्यांना भेटू लागलो, पण त्यांना माझे काम आवडले नाही. परंतु त्यानंतर सलमान खान, ज्यांना मी प्रेमाने मामु म्हणतो. त्याने मला एक सल्ला दिला."

सलमान खानबद्दल बोलताना बॉबी देओल पुढे म्हणाला, "त्याने मला सांगितले की, माझ्या वाईट काळात मी तुझ्या भावाच्या (सनी देओल) आणि संजय दत्तच्यासोबत काम करायला सुरूवात केली होती. ज्याचा मला फायदा झाला, तु देखील इतर कलाकारांसोबत काम केले, तर चांगले होईल, त्यानंतर मी सलमान खानचे शब्द गांभीर्याने घेतले आणि म्हणालो की, मला तुझ्या खांद्यावर उडी मारू दे (तुझ्यासोबत काम करु दे). "

त्यानंतर बॉबी देओलने सलमान खान सोबत काही चित्रपट देखील केले, ज्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यात मदत झाली, ज्यानंतर बॉबीने आश्रम सारख्या लोकप्रिय वेबसिरीजमध्ये देखील काम केलं, जेथे त्याच्या अॅक्टिंगला प्रेक्षक वर्गाकडून दाद मिळाली.

आपल्या वाईट काळाची आठवण काढत बॉबी देओल म्हणाला, "मला दारूचे व्यसन लागले, जो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. माझ्या कुटुंबातील सर्व चिंतित होते आणि ते मला यातून बाहेर काढू पाहत होते. माझी मुले तर माझ्या बायकोला विचारु लागले की, 'पप्पा कामावर का जात नाहीत?

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल त्याच्या कारकिर्दीबद्दल म्हणाला, "एकेकाळी मी एक मोठा स्टार असायचो, पण याचा मला काहीच फायदा होत नव्हता. मला काम मिळत नव्हते. माझे बाजार मूल्य पूर्णपणे घसरले होते. मी अशा टप्प्यातून गेलो जिथे हे सगळं काय आणि का घडतय हे देखील मला समजत नव्हते." परंतु आता हे चित्र संपूर्ण बदलं आहे.

बॉबी देओल आता अपने 2, क्लास ऑफ 83, लव हॉस्टेल या आगामी चित्रपटात देखील झळकणार आहे.