चोरी किया रे जियां.... सलमान- सोनाक्षीच्या लग्नातील 'वरमाला'च्या वेळचा फोटो व्हायरल

सलमान- सोनाक्षीच्या लग्नाचं वरुण धवनशी खास कनेक्शन... वाचून डोकं चक्रावून जाईल....   

Updated: Mar 9, 2022, 01:02 PM IST
चोरी किया रे जियां.... सलमान- सोनाक्षीच्या लग्नातील 'वरमाला'च्या वेळचा फोटो व्हायरल  title=

मुंबई : सध्या अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमुळे खरंच दोघांनी लग्न केलं का?  असा प्रश्न चाहत्यांकडून सतत उपस्थित केला जात होता. अखेर व्हायरल होत असलेला फोटो इडिट करुन बनवण्यात आला होता. त्या फोटोनंतर सलमान आणि सोनाक्षीचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

महत्त्वाचं म्हणजे या फोटोचं थेट कनेक्शन अभिनेता वरूण धवण सोबत आहे. खरं सांगायचं झालं तर आता व्हायरल होत असलेला सलमान-सोनाक्षीचा फोटो इडिट केलेला आहे. हा फोटो वरूणच्या लग्नातील आहे. 

अब सलमान और सोनाक्षी के जयमाल की तस्वीरें हुई वायरल, वरुण धवन से है कनेक्शन

फोटोमध्ये सलमान आणि सोनाक्षी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटो पाहून वरूण धवन आणि नताशा दलालच्या लग्नातील फोटो आठवतो. आता दोघांच्या लग्नातील फोटो इडिट करुन बनवण्यात आला आहे. 

सध्या फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण रंगणाऱ्या सर्व चर्चांना सोनाक्षीने काहीदिवसांपूर्वी पूर्णविराम लावला आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

सलमानसोबत लग्नातील पहिला फोटो व्हायरल होताचं सोनाक्षी माध्यमांसमोर

ज्यामध्ये ती म्हणाली, 'तुम्हाला खरे फोटो आणि इडिट केलेल्या फोटोंमधील अंतर कळत नाही का?'   सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. आता दोघे नव्या फोटोमुळे चर्चेत आहेत.