मुंबई : सध्या सलमान खान हा त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग ऑस्ट्रिया आणि अबुधाबीच्या सुंदर लोकेशन्सवर सुरू आहे. दरम्यान इथे एक घडलेला किस्सा समोर आला आहे.
एका अवॉर्ड शोमध्ये सलमान खानने त्याच्या एका उद्धट फॅनचा फोन जमिनीवर आपटून आपटून तोडल्याची माहिती मिळाली आहे.
फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, इथे एका अवॉर्ड शोमध्ये सलमान खान हा त्याच्या एका मित्रासोबत बोलत होता. तेव्हा त्याच्याजवळ एक फॅन आला आणि तो सलमानला त्याच्या ‘अनब्रेकेबल’ फोन दाखवू लागला. फॅनचं म्हणणं होतं की, हा फोन तुटू शकत नाही. तेव्हा सुरूवातीला सलमानने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत मित्रासोबत बोलणं सुरू ठेवलं. मात्र तरीही तो फॅन काही ऎकायला तयार नव्हता. तो पुन्हा पुन्हा फोनची खासियत बळजबरीने सांगत होता.
त्यानंतर सलमाने त्याच्याकडून फोन घेतला आणि जमिनीवर जोरात आपटला. मात्र, फोन तुटला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सलमानने फोन घेतला आणि पुन्हा आपटला. पण तरीही फोन तुटला नाही. इतक्यात तिथे गर्दी जमली. ते लोक सलमानला फोन तोडण्यासाठी चीअर करू लागले. अनेक प्रयत्नांनंतर सलमानने फोन तोडला. त्यानंतर सलमानने फोनचे तुकडे एकत्र केले आणि त्या फॅनला म्हणाला की, ‘अनब्रेकेबल फोन?’. त्यानंतर जमलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.
सलमान खानचा हा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा ख्रिसमसला रिलीज करण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. अली अब्बास यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात कतरिना कैफ दिसणार आहे. त्यानंतर सलमान खान हा ‘रेस ३’ मध्ये सैफ अली खानच्या जागेवर दिसणार आहे. यात जॅकलिन फर्नांडिस ही असणार आहे.