मुंबई : ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे बॉक्सऑफिसवरील खास गणित आहे. पण यंदा सलमान खानचा 'ट्युबलाईट' बॉक्सऑफिवर अपयशी ठरला.
त्यामुळे डिस्ट्रिब्युटर्सना झालेलल्या नुकसानाची परतफेड म्हणून सलमान खानने त्याचा 50 % वाटा परत केला आहे.
काही मिडिया रिपोर्टनुसार, डिस्टिब्युटर्स टीमचे प्रमुख नरेंद्र हिरावत यांनी 'ट्युबलाईट' 130 करोड रुपयांना विकत घेतली होती. याबाबतीत डिस्ट्रिब्युटर्सनी सलमान खानशी भेट घेतली त्यानंतर खान कुटूंबीयांनी डिस्ट्रिब्युटर्सना 50% रक्कम परत करण्याचा निर्नय घेतला तसेच त्यांच्या फायद्याचे काही निर्णय घेतले जातील असा विश्वास दिला आहे.
जुलै महिन्यात सलीम खान आणि डिस्ट्रिब्युटर्सची एक बैठक गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झाली. त्यावेळी माझ्या मुलाच्या चित्रपटामुळे झालेल्या नुकसानेचे मला भान आहे. आणि लवकरच त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असा सलीम खान यांनी विश्वास दाखवला होता. या मिटींगमध्ये सलमान खानची उपस्थिती नव्हती. पण मिडीया रिपोर्टनुसार डिस्टिब्युटर्स या मिटींगनंतर आनंदी चेहर्याने बाहेर पडले.
कबीर खान दिग्दर्शित 'ट्युबलाईट' च्या सिनेमाला 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी होती. सलमान खान सोबतच सोहेल खान आणि चीनी अभिनेत्री जुजू प्रमुख भूमिकेत होते.