आर्यन खान ड्रग्स प्रकरणात शाहरुखला मदत करणं salman khan ला पडलं महागात

पण आता सलमान खानच्या टायगर 3 वरही त्याचा परिणाम होत असल्याचे वृत्त आहे.

Updated: Oct 21, 2021, 06:13 PM IST
 आर्यन खान ड्रग्स प्रकरणात शाहरुखला मदत करणं salman khan ला पडलं महागात

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्स प्रकरणामुळे आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्यांच्या जामीनासाठी शाहरुखचं कुटुंब सतत शर्तीचे प्रयत्न करत आहेत. ड्रग्स प्रकरणी आर्यन खानचे पाय आणखी खोलात जात असल्याचं दिसत आहे. शाहरूख खान आणि गौरीला दिलासा मिळाला नाही. आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. आर्यन 26 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये होता. मात्र ही कोठडी आणखी 4 दिवस वाढवण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत आर्यन न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, अशी बातमी आली होती की शाहरुखने त्याचा मुलगा तुरुंगात असल्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग थांबवले आहे, पण आता सलमान खानच्या टायगर 3 वरही त्याचा परिणाम होत असल्याचे वृत्त आहे. हे का होत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

सलमान खान अलीकडेच तीन देशांमध्ये टायगर 3 चे शूटिंग पूर्ण करून परतला आहे. त्याने रशिया, ऑस्ट्रियामध्ये चित्रीकरण केले होते, त्यानंतर आता मुंबईत काही लढाईचे दृश्य चित्रीत केले जाणार होते, ज्यासाठी शहरातील विविध ठिकाणी सेट तयार करण्यात आले होते. पण आर्यन खानच्या अटकेचा परिणाम टायगर 3 वरही होत आहे. खरं तर, सलमान खानला पठाणमध्ये एक कॅमिओ करायचा होता पण आता तो ते शूट करू शकत नाही, ज्यामुळे त्याचा चित्रपट देखील रखडला आहे.

अहवालांवर विश्वास ठेवला तर शाहरुखच्या पठाण चित्रपटानंतर सलमानचा टायगर 3 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. अहवालांवर विश्वास ठेवला तर, सलमान शाहरुखच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या शेवटी सलमान आपला टायगर 3 लूक दाखवेल आणि नंतर चित्रपट पुढे नेला जाईल. दोन्ही चित्रपट यशराज बॅनरखाली बनत आहेत.

शाहरुखच्या पठाण चित्रपटात दीपिका आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत, तर सलमानच्या टायगर 3 चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी दिसणार आहेत. शाहरुखही या महिन्यात शूटिंगसाठी स्पेनला जाणार होता, पण मुलाच्या अटकेमुळे त्याने कार्यक्रम रद्द केला. आर्यनला जामीन मिळत नाही तोपर्यंत तो कोणत्याही प्रकल्पासाठी शूट करणार नाही, अशी माहिती आहे.