'भारत'ची जबरदस्त क्रेझ; चाहत्याकडून संपूर्ण थिएटर बुक

सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता 

Updated: Jun 2, 2019, 06:15 PM IST
'भारत'ची जबरदस्त क्रेझ; चाहत्याकडून संपूर्ण थिएटर बुक  title=

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमानचा 'भारत' येत्या ५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंगही सुरु करण्यात आलं आहे. 'भारत' चित्रपटासाठी सलमानच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सलमान खानच्या नाशिकमध्ये राहणाऱ्या एका चाहत्याने सलमानला पाहण्यासाठी चक्क संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे. 

'डेक्कन क्रोनिकल'ने दिलेल्या वृत्तानुसार, आशिष सिंघल नावाच्या एका सलमानच्या चाहत्याने 'भारत'च्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी, पहिला शो पाहण्यासाठी नाशिकमधील एक संपूर्ण थिएटर बुक केलं आहे. सलमानसाठीचं हे वेड पहिल्यांदाच पाहायला मिळत नसून आधीही अशा घटना पाहायला मिळाल्या आहेत. सलमान खानसाठी असणारं चाहत्यांचं वेड सर्वच मर्यादा उलटत आहे. त्यापैकीच हे एक उदाहरण आहे. 

'भारत' चित्रपटातून सलमान खान वेग-वेगळ्या लुकमधून सर्वांसमोर येणार आहे. तरुणपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. सलमान-कतरिना ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भारत'मध्ये सलमान, कतरिनासह बॉलिवूडमधील इतर कलाकारही दिसणार आहेत. दिशा पटानी, नोरा फतेही, वरुण धवन, जॅकी श्रॉफ, तब्बू आणि सुनील ग्रोवरही भूमिका साकारणार आहेत.  

'भारत'मधील गाण्यांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 'भारत' साउथ कोरियन 'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.