सलमाननं शाहरुख खानला दिलं 2500 आणि रेशन! काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...

Does Salman Khan Really Helped Shah Rukh Khan? : सलमान खाननं कधी आणि कशी केली होती 'शाहरुख खान'ला 2500 रुपये आणि किराण्याची मदत?

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2024, 11:53 AM IST
सलमाननं शाहरुख खानला दिलं 2500 आणि रेशन! काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...  title=
(Photo Credit : Social Media)

Does Salman Khan Really Helped Shah Rukh Khan? : बॉलिवूड कलाकारांसारखे दिसणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. शाहरुख खानपासून अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन पर्यंत सगळ्यांसारखे दिसणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर त्यांचे काही बॉडी डबल देखील आहेत. जे हुबेहुबे त्यांच्यासारखा अभिनय करतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. शाहरुख खानच्या बॉडी डबलचं नाव हे रिजवान आहे. त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आर्थिक संकटांविषयी सांगितलं. त्याशिवाय त्यानं हा देखील खुलासा केला की त्याच्या मदतीला सलमान खान आला होता. 

रिजवान खाननं सांगितलं की कोविड-19 महामारी दरम्यान, त्याच्याकडे पैसे नव्हते. काम नव्हतं आणि पत्नी प्रेग्नंट होती. सलमान खाननं त्याची मदत केली आणि त्याला पैसे दिले. अरहान खानच्या पॉडकास्टवर बोलताना रिजवान खाननं सांगितलं की 'त्याची पत्नी ही गर्भवती होती तेव्हा त्याच्या घरात राशन सुद्धा नव्हतं. मला कोणता इव्हेंट मिळत नव्हता. काही काम नव्हतं. परिस्थिती इतकी बिकट होती की मला काही सामान देखील विकावा लागला. सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या सगळ्यांचं एक युनियन आहे. त्यांच्याद्वारे सलमान खाननं मला 2500 आणि किराणा पाठवला. त्यानं केलेल्या मदतीसाठी मी त्याचा आभारी आहे. आणि देवाच्या क्रुपेनं आता माझा 2BHK फ्लॅट आहे आणि त्यावेळी जे काही विकलं होतं ते देखील परत विकत घेतलं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सलमान खान हा नेहमीच लोकांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसतो. मग कोणी माणूस असो किंवा मग सेलिब्रिटी. पण मग त्यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या शूटिंगवर व्यग्र आहे. पुढच्या वर्षी ईदला त्याचा 'सिकंदर' हा आपल्या भेटीला येईल. 

हेही वाचा : 'अनेकांना छेडणाऱ्या अनू मलिकसारख्या...'; कंगनाच्या कानशीलात लगावणारीच्या मदतीस निघालेल्या विशाल ददलानीला गायिकेनं सुनावलं

रिजवान हा कल्याणचा आहे. त्यानं सांगितलं की तो रोडसाईड ठेल्यांवर काम करायचा. त्यानंतर तो सेलिब्रिटी लूकअलाइक म्हणून मुंबईला शिफ्ट झाला. त्यानंतर त्याला शाहरुख खानचा बॉडी डबल म्हणून काम मिळू लागलं. त्यानं शाहरुख खआनच्या मोहब्बते आणि चक दे इंडिया या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय त्यानं अनेक जाहिरांतीमध्ये देखील काम केलं आहे.