'राधे'मुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये वाद

अभिनेता सलमान खानबद्दल नेहमी काहीतरी ट्रेंडमध्ये असतं.

Updated: Nov 25, 2019, 02:33 PM IST
'राधे'मुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये वाद title=

मुंबई : बॉलिवूडाचा 'दबंग' अभिनेता सलमान खानबद्दल नेहमी काहीतरी ट्रेंडमध्ये असतं. आता त्याच्या 'राधे' चित्रपटाबद्दल चर्चा रंगत आहे. 'Radhe: your most wanted Hero' तर 'हिरो' या शब्दावरून नेटकऱ्यांमध्ये गंमतीदार वाद सुरू आहेत. कोणी म्हणतं हिरोच्या ऐवजी 'भाई'हा शब्द असायला हवा. तर काही चाहत्यांनी 'हिरो'या शब्दाला पसंती दर्शवली आहे. आता हा वाद प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कदाचीत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभूदेवा यांना चित्रपटाच्या नावात बदल कारावा लागणार आहे. 

'हिरो' या शब्दाच्या ट्रेंडने रविवारपासून जोर धरला आहे. हा ट्रेंड टॉप टेनच्या यादीत सामील झाला आहे. या ट्रेंडमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. कारण 'भाई' या शब्दाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आणि आता ट्विटरवर मुलं देखील 'भाई' या शब्दाला पाठिंबा देत आहेत. 

'राधे' चित्रपट २००९ साली आलेल्या 'वान्टेड' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर आहे. तर दुसरीकडे सलमान सध्या 'दबंग ३' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

'दबंग ३'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. चित्रपटामध्ये मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चूलबूल पांडेच्या भूमिकेत झळकणाऱ्या सलमानच्या तरूणपणाच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई दिसणार आहे.  

त्याचप्रमाणे अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर प्रजापती पांडे यांची भूमिका प्रमोद खन्ना साकारणार आहे. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.