आता तुम्हीसुद्धा करू शकाल सलमान खानसोबत सिनेमात काम

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सचा गॉडफादर सलमान खान आहे.

Updated: Sep 20, 2017, 04:11 PM IST
आता तुम्हीसुद्धा करू शकाल सलमान खानसोबत सिनेमात काम  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सचा गॉडफादर सलमान खान आहे.

सलमान खानने अनेक अभिनेते,अभिनेत्रींना हिंदी सिनेमामध्ये प्रथम संधी दिली. परंतू आता सर्वसामान्यांमधूनही हरहुन्नरी कलाकारांना सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून एका खास व्हिडिओद्वारा सलमान खानने या संधीबाबत घोषणा केली आहे. 

सलमान खानच्या 'बिईंग इन टच' या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कलाकारांना ऑडिशन देण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अभिनेते,गायक आणि नृत्य कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. 
मुकेश झाब्रा यांच्या टीमाकडून शॉर्ट लिस्टेड होणार्‍या कलाकारांना सलमान खान प्रोडक्शनसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. ही संधी जगभरातील कलाकारांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. 

 सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, सूरज पांचोली, डेझी शाह अशा कलाकारांना हिंदी सिनेमात यशस्वीरित्या लॉन्च केल्यानंतर, सलमान खान आता आगामी चित्रपटात कोणत्या नव्या चेहर्‍यासोबत काम करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.