सलमान कुणाला महत्त्व देणार? अभिनेत्री कतरिना ''वाघीण'' ठरणार?

अभिनेत्री कतरिनाच्या लग्नासाठी सलमान खानने ही गोष्ट टाळली तर कतरिनाच ठरणार ''वाघीण''  

Updated: Nov 10, 2021, 02:24 PM IST
सलमान कुणाला महत्त्व देणार? अभिनेत्री कतरिना ''वाघीण'' ठरणार? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या  लग्नाच्या चर्चांनी सध्या तुफान जोर धरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकी लग्ना तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघे लग्न करणार असल्याचं स्पष्ट झालं. डिसेंबर महिन्यात दोघे लग्न करणार असल्याचं कळत आहे. लग्नासाठी त्यांनी राजस्थानमधील पॅलेस बूक केलं आहे. लग्नासाठी कतरिना आणि विकीच्या चाहत्यांसह त्यांचे कुटुंब देखील आनंदी आहे. चाहते आणि कुटुंबानंतर आता अभिनेता सलमान खानने देखली मोठं कतरिनाच्या लग्नासाठी मोठं पाऊल उचललं आहे. कतरिनाच्या लग्नासाठी सलमान नक्की काय करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे? 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, कतरिनाच्या लग्नासाठी सलमानने 'टायगर 3' चित्रपटाचं चित्रीकरण थांबवलं आहे. कतरिनाच्या लग्नात उपस्थित राहाण्यासाठी सलमानने चित्रपटाचं चित्रीकरण थांबवलं आहे. आता असं होणार असेल तर कतरिना खरंच वाघीण ठरणार आहे. सलमानने कतरिनासाठी जानेवारी महिन्यात चित्रपट शेड्यूल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

शाहरुखचा सलमानला पाठिंबा
फक्त कतरिना नाही तर शाहरुख खानसाठी देखील सलमानने चित्रपटांचं शुटिंग रद्द केलं आहे. अनेक वर्षांनंतर शाहरुख आणि सलमान एकत्र 'टायगर 3, 'पठान' चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. रिपोर्टनुसार आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर शाहरुख सध्या मुलासोबत वेळ घालवत आहे.  

आर्यन नुकताच सुमारे एक महिन्याची शिक्षा भोगून तुरुंगातून परतला आहे. अशा परिस्थितीत शाहरुखला कामातून ब्रेक घेऊन आर्यनवर लक्ष केंद्रित करायचे आहे. सलमानने शूटिंग डिसेंबरअखेरपर्यंत ढकलले आहे.