सलमान खान आता कॅटरिनाच्या बहिणीला बॉलिवूडमध्ये आणणार

एकानंतर एक फ्लॉप सिनेमेनंतर कॅटरिनाने टायगर जिंदा है या सिनेमातून पुन्हा कमबॅक केलं आहे. सलमानमुळे कॅटरिनाची प्रोफेशनल लाईफ पुन्हा चमकायला लागली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 3, 2018, 03:02 PM IST
सलमान खान आता कॅटरिनाच्या बहिणीला बॉलिवूडमध्ये आणणार title=

मुंबई : एकानंतर एक फ्लॉप सिनेमेनंतर कॅटरिनाने टायगर जिंदा है या सिनेमातून पुन्हा कमबॅक केलं आहे. सलमानमुळे कॅटरिनाची प्रोफेशनल लाईफ पुन्हा चमकायला लागली आहे.

कॅटरिनावर सलमान अजूनही मेहरबान आहे. कॅटरिनानंतर आता सलमान तिची बहिण इजाबेलचं करिअर बनवण्य़ाच्या मागे आहे. अनेक दिवसांपासून भारतात असलेली कॅटरिनाची बहिण इजाबेल कैफने काही दिवसांपूर्वीच एका कॉस्मेटिक ब्रँडला साईन केलं आहे. या कॉस्मेटिक ब्रँडसोबत कॅटरिनाने देखील काम केलं आहे. पण सलमान खानच्या सिफारशीमुळे कॅटरिनाची बहिण कॉस्मेटिक ब्रँड फेस बनली आहे.

इजाबेलने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम एक तिची अॅचिव्हमेन्ट शेअर केली. त्यानंतर सलमान खानने लगेचच त्याला लाईक करत. त्यावर तिला शुभेच्छा दिल्या. सलमान खान आता इजाबेलच्या करिअरवर देखील लक्ष देत आहे. सलमान लवकरच इजाबेलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. फक्त कॅटरिनासाठी तो हे सगळं करतो आहे.

सलमान खानने याआधी इजाबेलसाठी इंडो कॅनेडियन सिनेमा डॉ. कॅबी प्रोड्यूस केला होता. सलमानने कॅनडा आणि अमेरिकामध्ये जाऊन या सिनेमाचं खास प्रमोशन देखील केलं होतं. रणबीर कपूरमुळे सलमान खान कॅटरिनासोबतच तिच्या बहिणीपासून ही लांब होता. पण आता रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना पुन्हा सलमानच्या आयुष्यात आली आहे. तेव्हापासून सलमान पुन्हा कॅटरिनाची काळजी घेत आहे.