सलमानच्या अनेक अफेअर्सनंतर त्याच्या आयुष्यात 'ही' सुंदर मुलगी कोण?

अनेक अपयशी अफेअर्सनंतर त्याच्या आयुष्यात एका सुंदर मुलीची एन्ट्री? कोण आहे ती...  

Updated: Apr 13, 2022, 09:53 AM IST
सलमानच्या अनेक अफेअर्सनंतर त्याच्या आयुष्यात 'ही' सुंदर मुलगी कोण?  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. पूर्ण जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सलमानचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर खुद्द  सलमान खान देखील त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतो. 

आता देखील त्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सलमान एका सुंदर मुलीसोबत दिसत आहे. पण ही सुंदर मुलगी कोण आहे, हे अद्याप कळालेलं नाही. त्या मुलीसोबत सलमान देखील प्रचंड आनंदी दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या चर्चेत असलेल्या सलमान खानच्या फॅन क्लबमधून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सलमान खान थिएटरमध्ये येताना दिसत आहे. 

यादरम्यान सलमानची नजर एका सुंदर मुलीवर येऊन थांबली आहे, जिला पाहून तो हसत आहे. सलमानचे हसणे पाहून प्रत्येकाला असं वाटत आहे की, भाईजान त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला आहे. 

सलमानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरचं 'टायगर 3' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्याच्यासोबत सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.