Katrina Kaif Pregnancy: भारतात सध्या क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची चर्चा जोरात सुरु आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बेबी बम्पची चर्चा ताजी असताना आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवडू अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर विकी कौशलच्या घरात पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. यावरुन चाहत्यांना कतरिना प्रेग्नेंट असल्याचे दिसत आहे. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कतरिना सध्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा टायगर 3 हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कतरिना तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. तिच्या गरोदरपणाच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते कतरिना प्रेग्नंट असल्याचे सांगत आहेत.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घटनेचा आहे. ज्यामध्ये कतरिना कॅज्युअल लूकमध्ये दिसली होती. व्हिडीओमध्ये कतरिनाने डेनिमसह टॉप घातलेला दिसत आहे. यासोबतच तिने ओव्हरसाईज डेनिम जॅकेट घातले आहे. ज्यामुळे तिचे पोट बाहेर येत आहे. पण जेव्हा कतरिना चालते तेव्हा तिचे पोट दिसू लागते. तिचे पोट पाहून चाहते कतरिना प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.
कतरिना प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न एका यूजर्सने विचारला आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले की, ती प्रेग्नंट दिसत आहे. ती खूप सावधपणे चालत आहे आणि तिच्या हावभावावरून असे वाटते की जणू तीन महिने उलटून गेले आहेत.
कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीची बातमी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची बातमी आली होती. कतरिना अंबानी कुटुंबाच्या गणपती सोहळ्याला हजर राहिली नव्हती. या कार्यक्रमात विकी कौशल त्याचा भाऊ आणि वहिनीसोबत पोहोचला होता. त्यावेळी प्रेग्नेसीमुळे ती हजर राहिला नसावी असा अंदाज तिच्या चाहत्यांनी बांधला होता.
टायगर 3 साठी कतरिनाचे खूप कौतुक होत आहे. सिनेमात कॅटरिनाला अॅक्शनमध्ये पाहून चाहते वेडे झाले आहेत. यानंतर कॅटरिना मेरी ख्रिसमस सिनेमामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता पण तो पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता पुढच्या वर्षी जानेवारीत मेरी ख्रिसमस रिलीज होणार आहे.