शंभर टक्के खरी बातमी; सोनाक्षी नव्हे, दुसऱ्याच अभिनेत्रीशी सलमानचं लग्न ठरलं

सलमाननं त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते अगदी आता पन्नाशी ओलांडल्यानंतरच्याही चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली. 

Updated: Mar 9, 2022, 05:04 PM IST
शंभर टक्के खरी बातमी; सोनाक्षी नव्हे, दुसऱ्याच अभिनेत्रीशी सलमानचं लग्न ठरलं title=
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : यारों का यार, दबंग खान, भाईजान अशी बहुविध रुपं असणारा हा बॉलिवूडचा सर्वांचाच लाडका अभिनेता म्हणजे सलमान खान (Salman Khan) . सलमाननं त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते अगदी आता पन्नाशी ओलांडल्यानंतरच्याही चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली. 

आता तर म्हणे त्याच्या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा इथं वधुरूपात दिसत आहे. 

हे सगळं खरं. पण, मूळ मुद्दा असा की या अफवा आहेत. कारण, यातचं काहीच घडत नाहीये, किंबहुना बरेच फोटो तर मॉर्फ केलेले आहेत. 

तुम्हाला माहितीये का, सोनाक्षी सिन्हा नव्हे, तर अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्याशी सलमानचं लग्न होणार होतं. 

करण जोहरच्या एका कार्यक्रमात खुदद् सलमाननं याची कबुलीही दिली होती. एक वेळ अशी आली होती की मला तिच्याशी लग्न करायचं होतं, आम्ही दोघांनी कोणतीही चर्चा मात्र केली नव्हती. 

किंबहुना आमच्या लग्नाची पत्रिकाही छापली गेली होती.... पण, पुढे नात्याची समीकरणं बदलली आणि पत्रिकेतला लग्नाचा योग कधीच आला नाही. 

27 मे 1994 ला सलमान आणि संगीताचं लग्न होणार होतं. पण, सूत्रांच्या माहितीनुसार सोमी अली हिच्याशी त्याची वाढती जवळीक त्यांच्या नात्यात मीठाचा खडा टाकून गेली. 

सोमीही सलमानशी लग्न करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि तयारी सुरु असतानाच लग्नाचा हा बेत अर्ध्यावरच मोडला.

पुढे संगीतानं क्रिकेटपटू मोहम्मह अझरुद्दीन याच्याशी लग्न केलं. पण, आजही तिची आणि समानची मैत्री मात्र कायम आहे. 'दोस्ती की है, निभानी तो पडेगी ही....' याचप्रमाणं नाती बदलली असली तरीही त्यांची मैत्री मात्र अद्यापही कायम आहे. 

Revealed! Why Sangeeta Bijlani called off marriage with Salman Khan |  India.com

काय म्हणते संगीता? 
सलमानशी असणारी मैत्री कशी टिकवली या प्रश्नाचं उत्तर देताना संगीता म्हणते, 'काही बंध कधीच तुटत नाहीत. जोडीदार, मित्र यांच्यावर असणारं प्रेम कधीच कमी होत नाही. 

किंबहुना अनेक लोक येतात जातात, पुढेही येतील आणि जातील. तो काळ गेला जेव्हा मी लहान मुलांप्रमाणे वागायचे... आता मी मोठी झालेय...'