Bharat box office day 2 collection : दोन दिवसांतच 'भारत'च्या कमाईची लक्षणीय उसळी

कमाईचे आकडे पाहून म्हणाल.... 

Updated: Jun 7, 2019, 12:23 PM IST
Bharat box office day 2 collection : दोन दिवसांतच 'भारत'च्या कमाईची लक्षणीय उसळी
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भारत' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे अंदाजे किती उंची गाठतील यावरुन बराच आधी पडदा उचलला गेला होता. त्यातच आता खऱ्या अर्थाने जेव्हा या आकड्यांचा आलेख उंचावू लागला आहे, ते पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही नवे विक्रम प्रस्थापित करणार असंच चित्र दिसत आहे. 

पहिल्या दिवशी जवळपास ३० कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या भाईजान सलमानच्या 'भारत' या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी चांगलाच वेग पडकला. हा वेग पकडण्याचं कारण अर्थातच सलमानची लोकप्रियता आणि कतरिनासोबतची त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री.

अली अब्बास जफर दिग्जर्शित सलमानच्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवसअखेर धमाकेदार कमाई केली. परिणामी या चित्रपटाचा एकूण गल्ला ७३.३० कोटींवर पोहोचला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याविषयीची माहिती दिली. सायंकाळी आणि रात्रीच्या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असल्याचा मुद्दाही त्यांनी या ट्विटमधून मांडला. 

'भारत'ची एकंदर कामगिरी पाहता भाईजान सलमाचं हे रुप प्रेक्षकांना भावल्याचं स्पष्ट होत आहे. या चित्रपटात सलमानव्यतिरिक्त कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत'च्या वाट्याला आता पुढे कोणते नवे विक्रम येतात आणि त्या विक्रमांना मागे टाकत तो कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.