लवकरच सलमान खान लग्नाच्या बेडीत अडकणार?

लग्नांचा मौसम आला की हमखास सलमान खानच्या लग्नाची चर्चा होते पण 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 6, 2018, 12:49 PM IST
लवकरच सलमान खान लग्नाच्या बेडीत अडकणार?

मुंबई : लग्नांचा मौसम आला की हमखास सलमान खानच्या लग्नाची चर्चा होते पण 

आता या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळणार आहे. कारण सलमान खान लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्यामुळे आता लाखो तरूणींचा हार्टब्रेक करणारी ही बातमी स्वतः अभिनेता सलमान खानने दिली आहे.

सलमान खानने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. सलमान खानने ट्विट करून "मुझे लडकी मिल गयी" असं ट्विट करून आनंदवार्ता दिली आहे. सलमान खानचं लग्न हा कायम चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे. जगात काहीही घडेल पण सलमानचं लग्न ही अशक्य बाब आहे अशी चर्चा अनेकदा रंगली आहे. 

पण आता सलमान खानने स्वतःच यावर उत्तर दिल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. सलमान खानच्या या ट्विटला अवघ्या 20 मिनिटांत 7 हजाराहून अधिक लाईक असून 3 हजाराहून अधिक चाहत्यांनी कमेंट केले आहेत. अनेकांनी सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही तरूणींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सलमान खानचं लग्न हे अगदी जनसामान्यांपासून ते सिने कलाकारांमध्ये महत्वाचा विषय ठरला आहे. सलमान खानने 27 डिसेंबरमध्ये 52 वर्ष पूर्ण केली आहेत.मात्र असं असलं तरीही सलमानचा फिट अंदाज त्याच्या वयाची अजिबात जाणीव करून देत नाही. 

पण आता ही खरंच लग्नाची आनंदवार्ता आहे की थट्टा हे अद्याप कळलेलं नाही. सलमान खान आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तर असं करत नाही ना अशी देखील चर्चा आहे.