एकेकाळी जॅकी श्रॉफ यांचे कपडे-चप्पल सांभाळायचा सलमान खान, काय आहे हा किस्सा?

अशी झाली दोघांची मैत्री 

Updated: May 17, 2021, 09:09 PM IST
एकेकाळी जॅकी श्रॉफ यांचे कपडे-चप्पल सांभाळायचा सलमान खान, काय आहे हा किस्सा?

मुंबई : सलमान खान आणि जॅकी श्रॉफ एकमेकांना गेल्या तीन दशकांपासून ओळखत आहेत. दोन्ही कलाकारांनी अनेकदा प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे. हल्लीच दोघांनी प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या राधे या सिनेमात स्क्रीन शेअर केली आहे. हल्लीच जॅकी यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, फलक या सिनेमात सलमान एक असिस्टेंट दिग्दर्शकाच काम करत होता. तेव्हा त्याने जॅकी यांचे कपडे आणि शूज देखील सांभाळले आहेत. 

अशा पद्धतीने सलमानने घेतली जॅकी यांची काळजी 

लीडिंग डेलीला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी सांगितले की,सलमान खानसोबत त्याचं नातं खूप जुनं आहे. एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. जॅकी म्हणतात की,'मी सलमानला एक मॉडेल आणि नंतर असिस्टेंट दिग्दर्शक असल्यापासून ओळखतो. त्याने माझा सिनेमा फलकच्या शुटिंग दरम्यान कपडे आणि शूज सांभाळण्याचं देखील काम केलं आहे. ही गोष्ट 1988 मधील असेल. तेव्हा सलमान माझी अगदी भावासारखी काळजी घ्यायचा. '

जॅकी यांनी खुलासा केला की, सलमानला पहिला ब्रेक मिळण्याकरता त्यांनी खूप मदत केली. जेव्हा सलमान असिस्टेंट दिग्दर्शक होता. तेव्हा मी त्या निर्मात्यांना सलमानचा फोटो दाखवायचो. ज्यांच्यासोबत मी शूट करायचो. अखेर केसी बोकाडिया यांच्या बहिणीच्या नवऱ्याने सलमान खानला पहिला ब्रेक दिला. मात्र सलमानला 'मैने प्यार किया' मधून स्टारडम मिळालं. पण माझ्यामुळे त्याला पहिला ब्रेक मिळाला. अशी आमच्या मैत्रीची सुरूवात झाली. आमची मैत्री काही मोठी नाही. पण सलमान सिनेमा घेऊन येतो. आणि मी त्यामध्ये भूमिका साकारतो.