close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्वागत तो करो हमारा... पाहा 'दबंग ३'चा मेकिंग व्हिडिओ

'दबंग ३' चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये अधिक आहे. 

Updated: Nov 8, 2019, 04:44 PM IST
स्वागत तो करो हमारा... पाहा 'दबंग ३'चा मेकिंग व्हिडिओ

मुंबई : जेव्हा तो पोलिसांचे कपडे घालतो, सन ग्लासेस घालतो तेव्हा तो 'चुलबुल पांडे'च्या भूमिकेत जातो. 'लेकीन कोई दबंग पैदा नही होता, उसके पिछे एक कहानी होती है.' असं म्हणत 'दबंग ३' चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाची टीम सलमानचे कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता  सलमान खानच्या 'दबंग ३' चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये अधिक आहे. 

शिवाय, मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चूलबूल पांडेच्या भूमिकेत झळकणाऱ्या सलमानच्या तरूणपणाच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई दिसणार आहे.  

त्याचप्रमाणे अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर प्रजापती पांडे यांची भूमिका प्रमोद खन्ना साकारणार आहे. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.