घटस्फोटाच्या 2 महिन्यानंतर Samantha चं मोठं वक्तव्य, म्हणाली...

 समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामुळे साऊथ इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

Updated: Dec 5, 2021, 06:34 PM IST
घटस्फोटाच्या 2 महिन्यानंतर Samantha चं मोठं वक्तव्य, म्हणाली...

मुंबई : समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामुळे साऊथ इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. हे इंडस्ट्रीतील सगळ्यात सुंदर कपलपैकी एक होतं पण लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघंही वेगळे झाले. नागापासून घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर 2 महिन्यांनंतर आता समंथा सोशल मीडियावर स्वतःबद्दल खूप बोलत आहे. अभिनेत्रीने नुकतीच तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिच्या हातात एक कप आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना सामंथाने तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितलंय. यादरम्यान, तिने सांगितलं की, 'माझ्यासोबत सगळं काही घडलं ज्याची मला अपेक्षा होती किंवा मला आधीच माहित होतं की, ते होईल. काही गोष्टी तुमच्यात कायमस्वरूपी बदलतात...मला वाटतं देवाने मला माझा प्रवास चालू ठेवण्यासाठी पुरेशी ताकद दिली आहे. लॉकडाऊन दरम्यान मी मेडिटेशन करायला सुरुवात केली.

सामंथाने ट्रोलर्सवर आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'मी बिनाशर्त एसेप्टेंसची मागणी करत नाही. मी नेहमी लोकांना वेगवेगळी मतं मांडण्यास प्रोत्साहित करते मात्र तरीही आपण एकमेकांबद्दल प्रेम आणि करुणेची भावना बाळगू शकतो. मी फक्त त्यांना विनंती करेन की, त्यांनी त्यांची निराशा अतिशय सभ्य पद्धतीने व्यक्त करावी.

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या पहिल्या स्टोरीत तिने आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा शिकल्याबद्दल म्हटलं आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'आयुष्यातील सगळ्यात मोठा धडा म्हणजे मला अजून खूप काही शिकायचं आहे.'

दुसर्‍या पोस्टमध्ये, तिने शेरिल स्ट्रेडने लिहिलेला एक कोट शेअर केला आहे. त्यात तिने लिहिलंय की, 'बहुतेक गोष्टी ठीक होतील, पण सगळं काही होईल असं नाही. कधी कधी तुम्ही चांगली लढाई लढाल आणि हराल. कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न कराल आणि तुम्हाला असं वाटेल की, पर्याय नाही.. जाऊ द्या आणि जे आहे ते स्वीकारा.

सामंथा अनेकदा तिच्या मनात सुरू असलेल्या सगळ्या गोष्टी पोस्टच्या माध्यमातून शेअर करते. तिच्यावर होणारे वैयक्तिक हल्ले ती खंडित होऊ देणार नाही आणि आपला प्रवास आनंदाने सुरू ठेवणार असल्याचं तिच्या पोस्टवरून स्पष्ट झालं आहे.