अखेर तुम्हाला... म्हणत तिनं उचललं मोठं पाऊल

नागा चैतन्यची शेवटी आठवण मिटवणाऱ्या समंथाची भावूक पोस्ट... तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल   

Updated: Mar 23, 2022, 02:37 PM IST
अखेर तुम्हाला... म्हणत तिनं उचललं मोठं पाऊल  title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा आजकाल सतत चर्चेत आहे. नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर सामंथा स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांनी विभक्त होत असल्याची माहिती चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर समांथाने त्याला सोशल मीडियावरून अनफॉलो देखील केलं आहे. समांथाने सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. 

समांथाने नागासोबत असलेले सर्व फोटो देखील डिलीट केले आहेत. समांथाने नागाला अनफॉलो केल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, 'कधी-कधी एक छोटा स्पार्क असतो, जो अत्यंत शांतपणे सांगतो.... पुढे वाटचाल करा... तुम्हाला ते मिळून जाईल...'

समांथाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. सध्या समांथाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, समांथाने तिच्या लग्नातील साडी देखील नागा चैतन्याला परत केली आहे.