Samantha will Take Break From Acting : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. समांथा कधी नवी पोस्ट शेअर करेल किंवा तिची टीम सांगेल की तिचा कोणता नवा प्रोजेक्ट आहे, याची तिचे चाहते आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. अशात आता मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे समांथा चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. समांथा हा ब्रेक का घेणार आहे? आणि त्यामागचं काय कारण आहे हे देखील समोर आलं आहे.
रिपोर्ट्सनुसारस, समांथाच्या एका जवळच्या व्यक्तीनुसार, सिटाडेल आणि खुशी या चित्रपटांनंतर समंथाचा कोणताही नवीन बॉलिवूड किंवा साऊथ चित्रपट साइन करण्याचा कोणताही विचार नाही. खुशी चित्रपटानंतर ज्या प्रोजेक्ट्सवर ती काम करणार होती त्या प्रोजेक्ट्सच्या प्रोड्युसरनं दिलेले अॅडव्हान्स पेमेंटही तिने परत केलं आहे. त्याचं कारण म्हणजे तिला तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. समंथानं सर्बियामध्ये वरुण धवनसोबत सिटाडेल इंडियाचे शूटिंग केले. त्यानंतर समंथा सध्या विजय देवरकोंडासोबत 'खुशी' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. ज्यानंतर समंथा ही तिच्या तब्येतीकडे लक्ष देणार आहे. ती अभिनयक्षेत्रातून एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे, असं म्हटलं जात आहे. या ब्रेकनंतर समांथा तिच्या आगामी प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करेल.
हेही वाचा : पती अजय देवगणवर खटला दाखल करेन आणि तो सगळे गुन्हे कबूल करेल; Kajol चा मोठा खुलासा
समांथाला जेव्हापासून मायोसिटिस या आजाराचे निदान झाले, तेव्हापासून तिला आराम करायला वेळ मिळाला नाही. तिनं आधीच काही प्रोजेक्ट्सला होकार दिला होता. तर काहींवर काम सुरु होते. ज्यावेळी या आजाराचे निदान झाले त्यावेळी ती खुशीचं शूटिंग करत होती. आता तिला या आजारावर असणाऱ्या थेरपीच्या सेशन्सला देखील जावे लागते. अशात आता ते सगळे प्रोजेक्ट संपवत समांथा नवीन कोणतेही प्रोजेक्ट घेत नसून आराम करणार आहे. ऑगस्ट महिन्यात समांथा ही अमेरिकेत तिच्या या आजारावर उपाय करायला जाणार आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की हा ब्रेक वर्षभराचा असेल. ती सध्या ऑटोइम्यून या खूप भयानक आजाराशी झुंज देत आहे. सध्या अजून त्यावर काही उपा नाहीत. त्यामुळे ती अमेरिकेत जाणार आहे. त्यानंतर ती साऊथ कोरियाला देखील तिच्या या उपचारासाठी जाणार असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, समांथानं मायोसिटिसचे निदान होण्याला एक वर्षे पूर्ण झाले. तेव्हा समांथानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या लढाई विषयी सांगितले होते.
मायोसिटिस हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर या प्रकारात मोडणारा आजार आहे. ज्यामध्ये शरीराच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होतो. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये स्नायू दुखणे, थकवा येणे, खाणे-पिणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश होतो. पुरुषांपेक्षा महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो आणि मुलांवरही याचा परिणाम होऊ शकतो.