अमिताभला त्याच्याच शोमध्ये Sooryavansham वरून केलं ट्रोल! प्रॉपर्टीत हिस्सा मागितला, ‘हा’ आहे तरी कोण?

लोकप्रिय YouTuber आणि स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाने अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 16' या शोमध्ये तन्मय भट्ट आणि भुवन बम यांच्यासोबत भाग घेतला. या भागामध्ये तिघांनीही अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेशीर संवाद साधले आणि त्यांच्या चित्रपटांवरील गमतीशीर किस्से सांगितले.

Intern | Updated: Jan 30, 2025, 02:13 PM IST
अमिताभला त्याच्याच शोमध्ये Sooryavansham वरून केलं ट्रोल! प्रॉपर्टीत हिस्सा मागितला, ‘हा’ आहे तरी कोण? title=

'Kaun Banega Crorepati 16': सोनी टिव्ही वरील क्विज शो 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये समय रैना, भूवन बम, तन्मय भट्ट हे युट्युबर आले होते. त्यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या समय रैना आणि तन्मय भट्ट यांनी बिग बींसोबत अनेक किस्से शेअर केले. समय रैनाने 'कौन बनेगा करोडपती 16' शो दरम्यान बिग बींच्या प्रसिद्ध चित्रपट 'सूर्यवंशम'वर एक विनोद केला. त्याने असे म्हटले की, 'मी अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट पाहिला तो 'सुर्यवंशम', दुसरा पाहिला 'सुर्यवंशम' आणि तिसरा चित्रपट पाहिला तोही 'सुर्यवंशम', कारण सोनी मॅक्सवर वारंवार तोच चित्रपट लागतो.' ही गमतीदार टिप्पणी तिथे थांबली नाही, पुढे समयने अमिताभ यांना प्रश्न विचारला - चित्रपटातील त्यांच्या पात्राला विषारी खीर माहीत असताना ही ती खीर का चाखली?  यावर बिग बी हसू लागले. पुढे अमिताभ यांनी आपला प्रसिद्ध डायलॉग म्हटला 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह' यावर समयने त्याचा उत्साह व्यक्त करताना अमिताभ यांच्याकडे एक मजेशीर विनंती केली, 'आता तुम्ही मला मुलगा मानलेचं आहे, तर तुमच्या संपत्तीत थोडा हिस्साडी द्या?' यावर बिग बींनी हसत हसत उत्तर दिलं की, 'जर मुलगा बनवायचं असेल, तर मग नक्कीचं!' अमिताभच्या हसऱ्या उत्तराने शोमध्ये आणखी रंग भरला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

समयने आणखी एक किस्सा सांगितला, ज्यात एकदा त्याने अमिताभच्या जुहूतील 'जलसा' बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याचा आणि त्याच्या आजीचा पाठलाग केला आणि त्यांना मारहाण केली. हा किस्सा ऐकून अमिताभही हसू लागले आणि कार्यक्रमात आणखी चांगले वातावरण निर्माण झाले.

त्याच्या यूट्यूब चॅनलवर 'इंडियाज गॉट लेटेंट' या वादग्रस्त रोस्ट शोच्या कारणामुळे, समय रैनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तरीसुद्धा, त्याला खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग मिळालं आहे. त्याच्या तिखट आणि गडबड शैलीमुळे त्याच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळते. समयच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांनी खूप मान्यता दिली आहे, ज्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शोच्या शेवटी, समयने एक अप्रतिम क्षण दिला, ज्यात त्याने अमिताभ बच्चन यांच्याशी बसण्याच्या अनुभवावर विश्वास व्यक्त केला आणि म्हटलं, 'माझा विश्वास बसत नाही सर, तुम्ही आमच्यासोबत बसले आहात.' या छोट्या पण मजेदार संवादाने शोचे वातावरण आणखी हलके आणि आनंददायक बनवले.

समय रैनाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं तर, तो त्याच्या यूट्यूब चॅनलवरील रोस्ट शोच्या पुढील सीझनवर काम करत आहे. तो पुन्हा एकदा आपल्या तीव्र विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x