NCB च्या Sameer Wankhede यांचं daily routine

 NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सगळ्यांच्याच चर्चेत आहेत. 

Updated: Oct 6, 2021, 03:58 PM IST
NCB च्या Sameer Wankhede यांचं daily routine title=

मुंबई :  NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सगळ्यांच्याच चर्चेत आहेत. समीर वानखेडे सध्या बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनच्या तपासात व्यस्त आहेत. त्यांनी अलीकडेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईत क्रूझ रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर अटक केली. 

एनसीबीच्या या सिंघमबद्दल जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता आहे. आर्यन खान आता 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात असेल. आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाशिवाय, समीर वानखेडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची केस देखील हाताळत आहे.

समीर वानखेडे हे आपला संपुर्ण दिवस कसा घालवतात याबद्दल त्यांची पत्नी आणि अभिनेत्री  क्रांती रेडकर यांनी खुलासा केला आहे. सगळ्यांनाच डॅशिंग वाटणारे समीर वानखेडे दिवसभरात फक्त 2 तास झोपतात.

अलीकडेच, एका मुलाखतीत त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी पती समीर वानखेडे खूप मेहनती आहेत. त्यांनी भूतकाळात अनेक मोठ्या ऑपरेशन आणि केसेस देखील केल्या आहेत. यावेळी ते बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरणांच्या तपासात गुंतले आहेत, म्हणून ते अधिक ठळक होत आहे.

24x7 काम , 2 तास झोप

क्रांती रेडकर म्हणाल्या, 'जेव्हाही समीर आपले ऑपरेशन करत असतो किंवा काही तपासात गुंतलेला असतो, तेव्हा मी त्याला त्याचा वेळ देते. मी त्याला कधीही विचारले नाही की काय झाले, कसे झाले कारण मला त्याच्या कामाची गोपनीयता समजली. मी घरी सर्व गोष्टींची काळजी घेते आणि म्हणून तो त्याच्या बाबींकडे अधिक लक्ष देतो.

क्रांती म्हणाली, 'कधीकधी समीर वानखेडे इतके व्यस्त होतात की, त्यांना झोपही येत नाही. ते 24x7 कामात असतात आणि जेमतेम 2 तास झोपतात. जेव्हा ते फोनवर एखाद्या प्रकरणाबद्दल बोलत असतो, तेव्हा मी कधीही हस्तक्षेप करत नाही किंवा गुंतत नाही. ते दररोज गुप्त कारवाया करतात. याविषयी त्याला कुटुंबाला काहीही सांगण्याची परवानगी नाही.