मौलानासोबत निकाह केल्यानंतर सनाने व्यक्त केल्या भावना

'आम्ही अल्लाहसाठी एकमेकांवर प्रेम केलं आहे...'

Updated: Nov 23, 2020, 09:56 AM IST
मौलानासोबत निकाह केल्यानंतर सनाने व्यक्त केल्या भावना

मुंबई : 'जय हो' फेम अभिनेत्री सना खानने  नुकताच गुजरातमधील मौलाना मुफ्ती अनस याच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या निकाहचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या फोटोवर नेटकरी कमेंट देखील करत आहे. सनाने धर्माचं कारण देत तिने चित्रपट विश्वाला रामराम ठोकला होता. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती. आता देखील मैलानासोबत निकाहनंतर तिच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. 

दरम्यान, तिने निकाहनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहे. लग्नाचा एक फोटो पोस्ट करत तिने 'आम्ही अल्लाहसाठी एकमेकांवर प्रेम केलं आहे... अल्लाहसाठी आम्ही लग्न केलं आहे...या जन्मात अल्लाह आम्हाला एकत्र ठेवेल आणि स्वर्गात पुन्हा एकमेकांना भेटू...' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

सनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. सनाने २० नोव्हेंबर रोजी गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला. याआधी ती  प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. परंतू त्यांचं नातं फोर काळ टिकलं नाही. शिवाय तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते.